Lokmat Money >गुंतवणूक > Investment Tips : १० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित 

Investment Tips : १० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार योग्य कॉर्पस बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:45 PM2023-01-17T15:45:33+5:302023-01-17T15:47:05+5:30

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार योग्य कॉर्पस बनवू शकता.

Investment Tips Want to accumulate 1 crore in 10 years See how much you need to do SIP Learn math | Investment Tips : १० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित 

Investment Tips : १० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार योग्य कॉर्पस बनवू शकता. यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकतो. SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे केलेली ही गुंतवणूक अप्रत्यक्षपणे बाजाराशी जोडलेली आहे. जर तुमचे उद्दिष्ट पुढील 10 वर्षात 1 कोटी रुपये जमा करायचे असेल, म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉर्पस तयार करायचा असेल, तर तुम्हाला पूर्णपणे शिस्तबद्ध राहून दरमहा निश्चित SIP रक्कम गुंतवावी लागेल.

1 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी, फ्रँकलिन टेम्पलटन इंडियाच्या SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने गुंतवणूक आणि परतावा समजून घेण्याचा प्रयत्न करुया. कंपनीच्या कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला पुढील 10 वर्षांत 1 कोटी रुपये कमवायचे असतील, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 43,471 रुपयांची SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करावी लागेल. ही गणना 12 टक्के वार्षिक परताव्याच्या आधारे करण्यात आली आहे. त्याच वेळी तुम्हाला एकूण 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. हे पूर्णपणे त्या फंडाच्या बाजारातील कामगिरीवर अवलंबून असते.

50 लाखांसाठी कितीची करावी लागणार एसआयपी
तुम्हाला पुढील 10 वर्षांमध्ये 50 लाख रुपयांचा निधी तयार करायचा असेल, तर फ्रँकलिन टेम्पलटन इंडियाच्या SIP कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला दरमहा SIP मध्ये 21,735 रुपये गुंतवावे लागतील. ही गणना 12 टक्के परताव्याच्या आधारेही करण्यात आली आहे. जर तुम्हाला 20 वर्षात 1 कोटी रुपये हवे असतील तर गणनेनुसार तुम्हाला एसआयपीमध्ये 10,109 रुपये गुंतवावे लागतील.

(टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Investment Tips Want to accumulate 1 crore in 10 years See how much you need to do SIP Learn math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.