Join us

Investment Tips : रोज केवळ २० रुपये वाचवून होऊ शकता कोट्यधीश, फक्त करावं लागेल इतकं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 9:35 AM

Investment Tips : एक दिवस आपण श्रीमंत व्हावं, आपल्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Investment Tips : एक दिवस आपण श्रीमंत व्हावं, आपल्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मध्यमवर्गीय व्यक्तीला इतका पैसा जोडणे सोपे नसते हेही सर्वांना माहीत आहे. परंतु आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 20 रुपये वाचवावे लागतील.

दररोज फक्त 20 रुपये वाचवून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. म्युच्युअल फंडात दररोज 20 रुपये गुंतवून तुम्ही 10 कोटी रुपयांची रक्कम जमा करू शकता. परंतु, हे करण्यासाठी, गुंतवणूक कशी करावी याचे योग्य नियोजन केले पाहिजे. दररोज 20 रुपये वाचवून तुम्ही कसे कोट्यधीश होऊ शकता ते आपण पाहूया.

एसआयपीमध्ये गुंतवणूकतुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून दिवसाला फक्त 20 रुपये वाचवले तर एका महिन्यात ही रक्कम 600 रुपये होईल. तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 600 रुपये एसआयपी करा. ही गुंतवणूक तुम्हाला संपूर्ण 40 वर्षांसाठी करावी लागेल. ही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरवर्षी जवळपास 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. त्यानुसार 40 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1.88 कोटी रुपये मिळतील. या 40 वर्षांमध्ये तुम्हाला फक्त 288000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्हाला 600 रुपयांच्या SIP वर 20 टक्के परतावा मिळत असेल तर 40 वर्षात तुम्हाला एकूण 10.21 कोटी रुपये जमा होतील.

(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा