Lokmat Money >गुंतवणूक > Investment Tips : १००० रुपयांच्या SIP नं बनू शकता लखपती, मिळतील ५० लाख; एक्सपर्ट्सचा सल्ला जरुर ऐका

Investment Tips : १००० रुपयांच्या SIP नं बनू शकता लखपती, मिळतील ५० लाख; एक्सपर्ट्सचा सल्ला जरुर ऐका

आपण कोट्यधीश व्हावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असेल. आपण योग्य फायनॅन्शिअल टीप्स स्वीकारल्यास ते बनणे देखील सोपे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:46 PM2023-01-25T16:46:54+5:302023-01-25T16:47:23+5:30

आपण कोट्यधीश व्हावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असेल. आपण योग्य फायनॅन्शिअल टीप्स स्वीकारल्यास ते बनणे देखील सोपे आहे.

Investment Tips You can become a millionaire with a SIP of 1000 rupees you will get 50 lakhs Be sure to listen to the advice of experts sip investment calculator | Investment Tips : १००० रुपयांच्या SIP नं बनू शकता लखपती, मिळतील ५० लाख; एक्सपर्ट्सचा सल्ला जरुर ऐका

Investment Tips : १००० रुपयांच्या SIP नं बनू शकता लखपती, मिळतील ५० लाख; एक्सपर्ट्सचा सल्ला जरुर ऐका

आपण कोट्यधीश व्हावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असेल. आपण योग्य फायनॅन्शिअल टीप्स स्वीकारल्यास ते बनणे देखील सोपे आहे. सर्व आर्थिक तज्ज्ञांचा एक समान सल्ला आहे की प्रथम तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. त्यानंतर योग्य गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुमची गुंतवणूक जितकी जास्त असेल तितका जास्त परतावा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपीची शिफारस केली जाते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला दीर्घ मुदतीत मल्टिपल टाईम परतावा मिळतो. अशा स्थितीत कमाईसोबतच गुंतवणूक सुरू केल्यास नफा अधिक मिळेल.

1000 रुपयांची एसआयपी
साधारणपणे, तरुण वयाच्या 23-25 ​​व्या वर्षी कमाई करू लागतात. कमाई लवकर सुरू होते, पण गुंतवणूक उशिरा सुरू होते. या विलंबामुळे आर्थिक स्थैर्य मिळत नाही. या लेखात, आम्ही तुम्हाला सांगू की 1000 रुपयांची SIP तुम्हाला कमाई सुरू करताच गुंतवणूक करून करोडपती कशी बनवते. 1000 रुपये दरमहा ही तुमच्या भविष्यासाठी गुंतवणुकीसाठी खूप कमी रक्कम आहे.

रिटायरमेंटवर 50 लाख
SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर एखादा तरुण वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 1000 रुपये जमा करू लागला, तर तो त्याच्या निवृत्तीसाठी 40-60 लाख रुपयांचा निधी सहज तयार करू शकतो. कॅल्क्युलेटरनुसार, जर कोणी वयाच्या 25 व्या वर्षी दर महिन्याला 1000 रुपये SIP करत असेल आणि त्याला सरासरी 11 टक्के परतावा मिळत असेल, तर त्याला निवृत्तीनंतर म्हणजेच 60 व्या वर्षी एकूण 49.73 लाख रुपये मिळतील. या 35 वर्षांत त्यांची एकूण जमा रक्कम केवळ 4.2 लाख रुपये असेल, तर परतावा 45.53 लाख रुपये आहे. नेट रिटर्न सुमारे 50 लाख आहे.

5 वर्षांचा उशीर आणि…
जर सरासरी 10 टक्के परतावा मिळत असेल तर त्याला एकूण 38.28 लाख रुपये मिळतील. जर परतावा 12 टक्के असेल तर त्याचा निधी 65 लाख रुपये असेल. जर गुंतवणूक 30 वर्षापासून सुरू केली असेल आणि परतावा 11 टक्के असेल, तर त्याला निवृत्तीनंतर एकूण 28.30 लाख रुपये मिळतील. ही गणित स्पष्टपणे दर्शवते की केवळ 5 वर्षांच्या विलंबाने, त्याच्या निवृत्ती निधीमध्ये सुमारे 12 लाख रुपयांची घट होते. यामुळेच आर्थिक तज्ज्ञ लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देतात.

(टीप - या लेखात गुंतवणूकीसंदर्भात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Investment Tips You can become a millionaire with a SIP of 1000 rupees you will get 50 lakhs Be sure to listen to the advice of experts sip investment calculator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.