House Rent VS Home Loan EMI : आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी लोक गृहकर्ज काढून घर खरेदी करतात. भाड्याने राहण्यापेक्षा यात आणखी थोडे पैसे टाकून आपलं घर होईल, असा त्यांचा विश्वास असतो. तर काही लोक घर घेण्याऐवजी भाड्याने राहणे पसंत करतात. कारण घराचे भाडे होम लोन ईएमआयपेक्षा स्वस्त आहे. पण, हा निर्णय व्यक्तिपरत्वे बदलू शकतो. तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता? हे जाणून घेण्यासाठी घर खरेदी करणे किंवा भाड्याने राहणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही हे तपासून पाहणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात, विशेषत: भारतीय कुटुंबांमध्ये स्वतःच्या मालकीचे घर असणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण घर खरेदी करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, त्यामुळे हा एक आव्हानात्मक निर्णय होतो. घर भाड्याने घेणे हा अधिक व्यावहारिक आणि परवडणारा पर्याय असू शकतो. याउलट स्वतःचे घर असणे ही सुरक्षिततेची भावना असते.
तज्ज्ञांच्या मते, घर घेणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असले तरी, मालमत्तेच्या वाढत्या किमती, विशेषत: मेट्रो शहरांसारख्या शहरांमध्ये, लोक खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहण्यास प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, जे लोक खरेदी करू शकतात. त्यांनी घर खरेदी आणि भाड्याने घर घेणे यापैकी एक निवडणे आवश्यक आहे.
घर खरेदीचे फायदेतुम्ही घर भाड्याने घेतल्यास, घरमालक तुम्हाला कधीही घर रिकामे करण्यास सांगू शकतो. पण, तुमच्या मालकीचे घर असल्यास एक सुरक्षेची भावना मनात असते. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला घरमालकच्या संमतीची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय घर खरेदी म्हणजे सुरक्षित आर्थिक गुंतवणूक मानली जाते. दिवसेंदिवस रिअल इस्टेटच्या किमती वाढतच चालल्या आहेत. या वाढीचा फायदाही तुम्हाला होतो.
मालमत्तेच्या मूल्यांकनात वाढरिअल इस्टेट फर्म जेएलएलच्या आकडेवारीनुसार, गेल्या २० वर्षांमध्ये कमाईपेक्षा घराचा खर्च अधिक वेगाने वाढला आहे. कारण वाढत्या निवासी घरांच्या किमती जलद वाढीशी जुळतात. तुमचे घर अपग्रेड करण्यासाठी आणि तुमची पोर्टफोलिओ संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही या पैशाचा गुंतवणूक म्हणून वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला यापुढे भाडेवाढ, नवीन अटी किंवा नवीन करार यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही आता भाडेकरू नाही.
घर भाड्याने घेतल्याचे फायदेवाढत्या मालमत्तेच्या किमती आणि इतर खर्चामुळे बहुतांश लोक घर खरेदी करण्यास धजावत नाहीत. घराचे हप्त्यांपेक्षा घरभाडे तुलनेने खूपच स्वस्त पडते. हा खर्च शहरानुसार बदलत असला तरी, बहुतेक महानगरांमध्ये याचा अनुभव येतो. गृहकर्ज काढून घेतलेल्या घराचे हप्ते प्लोटींग व्याजाप्रमाणे वाढतच जाणारे असतात. त्यामुळे भविष्यात तुमचे उत्पन्न वाढले तरी घराच हप्ताही वाढतच जाणारा असतो.
घर खरेदी करताना अनेक प्रकारचे खर्च होतात. तुम्हाला फक्त ईएमआय भरायचा नसतो. तर डाउन पेमेंट ही पहिली गोष्ट आहे जी तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करते. तुमचे घर खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या एकूण आगाऊ खर्चाचा हा एक भाग आहे. परिस्थितीनुसार, संबंधित कायदेशीर खर्च, इतर कमिशन आणि शुल्क देखील बँक आकारते. याशिवाय व्यवहार नोंदणी शुल्क आणि इतर करही लागू होतात. परंतु, भाड्याच्या घरात कोणत्याही प्रकारची अडचण नसते. घर खरेदी करताना लागणाऱ्या अतिरिक्त शुल्क आणि गृहकर्जाच्या व्याजातून सूट मिळते.
गृहकर्ज हे दीर्घकालीन कर्ज असल्याने तुमच्या निवृत्तीपर्यंत तुमच्यावर या कर्जाचं ओझं राहते. शिवाय व्याजापोटी बँकेला घराच्या मूळ किमतीच्या दुप्पट पैसे तुम्ही देता. त्यामुळे घर घेण्याऐवजी भाड्याने घर घेणे अधिक फायदेशीर आहे. कारण घर भाड्याने घेणे हे खरेदीपेक्षा कमी खर्चिक आहे. भाडेकरू सामान्यतः विविध सुविधा आणि इतर सेवांसाठी खरेदीदारांपेक्षा कमी पैसे देतात. त्यामुळे भाड्याच्या घराला अधिक पसंती आहे.
भाड्याने राहावे की घर खरेदी करावे?जर तुम्ही स्वतःचे घर घेणार असाल तर आधी घर खरेदी आणि घर भाड्याने घेण्याच्या खर्चाची तुलना करा. अन्यथा तुम्हाला नंतर पस्तावावे लागेल. कारण घर विकत घेण्यापेक्षा घर भाड्याने घेणे सामान्यांसाठी स्वस्त आहे. त्यामुळे सध्या लोक घर घेण्याऐवजी भाड्याने घर घेणे पसंत करत आहेत. कारण गृहकर्जाच्या ईएमआयपेक्षा घराचे भाडे परवडते. ईएमआय व्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा अनेक प्रकारचे शुल्क वाढते. ज्याचा तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो.