Join us

Jio Financial आणि ब्लॅकरॉकचं जॉईंट व्हेन्चर, देशातील लाखो गुंतवणूकदारांना करणार फंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:06 PM

याचं नाव आता जिओ ब्लॅकरॉक असं असेल.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (Jio Financial Services Limited) आणि दिग्गज अमेरिकन गुंतवणूक कंपनी ब्लॅकरॉक (BlackRock) यांनी बुधवारी एका संयुक्त उपक्रम कंपनीची घोषणा केली. याचं नाव आता जिओ ब्लॅकरॉक (Jio BlackRock) असेल. या कंपनीत दोघांचेही 50-50 टक्के स्टेक असतील. हे देशातील लाखो गुंतवणूकदारांना तंत्रज्ञानावर आधारित परवडणारे आणि नवे इनव्हेस्टमेंट सोल्युशन प्रदान करण्यात मदत करेल.

ब्लॅकरॉककडे गुंतवणूक व्यवस्थापन, तसंच जोखीम व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानामध्ये कौशल्य आहे. दुसरीकडे, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसकडे देशांतर्गत बाजारपेठेचं मजबूत ज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधा आहेत. भारतीय बाजारपेठेत आपली व्याप्ती वाढवणं आणि स्केल असलेली नवीन फर्म लॉन्च करण्याचं संयुक्त उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

दोन्ही भागीदार नवीन फर्ममध्ये 15 कोटी डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक करतील. भारतीय गुंतवणूकदारांना तंत्रज्ञानावर आधारित आणि किफायतशीर गुंतवणुकीचे उपाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ते एकत्र काम करणार आहेत. "भारतात अनेक संधी आहेत. या ठिकाणी लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे आणि या क्षेत्रात सुरू असलेले बदल बाजाराला नवा आकार देत आहेत. आम्ही भारताच्या असेट मॅनेजमेंट इंडस्ट्रीज क्रांती आणणं आणि फायनान्शिअल फ्युचर बदलण्यासाठी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेससह भागीदारीबाबत उत्सुक आहोत," अशी प्रतिक्रिया ब्लॅकरॉकचे एशिया पॅसिफिक चेअरमन आणि प्रमुख राचेल लॉर्ड यांनी दिली.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसाय