Lokmat Money >गुंतवणूक > आताच नोकरी सुरू केलीये?, जाणून घ्या आर्थिकरित्या कसं होता येईल सक्षम

आताच नोकरी सुरू केलीये?, जाणून घ्या आर्थिकरित्या कसं होता येईल सक्षम

जर तुमचे वय 20 किंवा 30 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमची पहिली किंवा दुसरी नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींबाबत गंभीर असणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 07:46 PM2022-09-09T19:46:41+5:302022-09-09T19:47:07+5:30

जर तुमचे वय 20 किंवा 30 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमची पहिली किंवा दुसरी नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींबाबत गंभीर असणे आवश्यक आहे.

Just started a job know how to become financially capable investment tips and tricks know more details insurance shares | आताच नोकरी सुरू केलीये?, जाणून घ्या आर्थिकरित्या कसं होता येईल सक्षम

आताच नोकरी सुरू केलीये?, जाणून घ्या आर्थिकरित्या कसं होता येईल सक्षम

आज तरुणांसाठी पूर्वीपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी आहेत. आपल्या करिअरवर फोकस करणाऱ्या तरुणांना एकाच नोकरीत जास्त काळ राहायचे नसते. अधिक अनुभव आणि चांगल्या पॅकेजसाठी ते काही वर्षांनी नोकरी बदलतात. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यात काही गैर नाही. पण, नोकरीदरम्यान बचत आणि गुंतवणुकीवर भर देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

जर तुमचे वय 20 किंवा 30 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमची पहिली किंवा दुसरी नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींबाबत गंभीर असणे आवश्यक आहे. तुम्हाला दर महिन्याला तुमच्या पगाराचा काही भाग शेअर किंवा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. जस जसं तुमचं वय वाढत जातं तशा कालांतरानं जबाबदाऱ्या कमी होत जाजात. तेव्हा तुम्ही तुमच्या बचतीचा 60 ते 80 टक्के हिस्सा शेअर्समध्ये गुंतवू शकता. दीर्घ कालावधईत शेअर्समध्ये रिटर्न इनफ्लेशनच्या रेटच्या तुलनेत अधिक असतं. जेव्हा तुम्ही 20+ होता तेव्हा तुमच्याकडे शेअर्समध्ये अधिकाधिक पैसे गुंतवण्यास वाव असतो, अशी प्रतिक्रिया फायनॅन्शिअल आर्टिस्टचे फाऊंडर महर धामोदीवाला यांनी दिली.

मुंबई आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांचा खर्च अधिक असतो. घरासाठी जास्त भाडे भरण्याबरोबरच ते घर ते ऑफिस प्रवासातही मोठा खर्च करतात. असं असलं तरी त्यांनी गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी पगाराचा काही भाग शेअर्समध्ये गुंतवला पाहिजे. “तरुण वयात रिअल इस्टेटऐवजी स्टॉक आणि डेटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. जर तुमच्याकडे असा पैसा आहे ज्याचा तुम्ही कधीही वापर करू शकता, तर यामुळे तुमचा आत्मविश्वास उंचावतो. चांगल्या करिअरसाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा धोका पत्करू शकता. तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करू शकता,” असं वक्तव्य गेनिंग ग्राऊंड इनव्हेस्टमेंट सर्व्हिसेसच्या फाऊंडर क्षितीजा शेट्ये यांनी केलं.

ऑफरपासून बचाव करा
जास्त खर्च करण्याच्या सवयींमुळे व्यक्तीला अनेक वेळा कर्ज घ्यावं लागतं. आज इन्स्टंट लोन अॅप सादर केल्यामुळे, फिरायला जाण्यापासून, भाडे भरण्यापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. पण, ही कर्जे खूप महाग आहेत. काही वेळा तुम्ही वेळेवर परतफेड न केल्यास ते तुमच्यासाठी मोठं ओझं बनतं. तुम्ही 'बाय-नाऊ-पे-लेट’र सारख्या कर्जांच्या ऑफर देखील टाळल्या पाहिजेत.

फायनॅन्शिअल फ्रिडम म्हणजे काय?
फायनॅन्शिअल फ्रिडम म्हणजे तुमची गुंतवणूक नियमितपणे वाढली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्याकडे आपत्कालीन निधी असेल तरच हे होऊ शकते. तुमच्याकडे किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चासाठी आपत्कालीन निधी असावा. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुमची म्युच्युअल फंडाची एसआयपी थांबवावी लागणार नाही. तुम्हाला कोणाकडे कर्ज मागण्याचीही गरज नाही.

इन्शुरन्स खरेदी करणं फायद्याचं
तरुण वयात विमा खरेदी करणे देखील खूप फायदेशीर आहे. लाइफ इन्शुरन्ससोबतच तुमच्याकडे आरोग्य विमाही असावा. यामुळे, आजारी पडल्यास, तुम्हाला तुमच्या बचतीतून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तुम्हाला कंपनीकडून मेडिक्लेम पॉलिसी मिळाली असली तरी तुम्ही वैयक्तिक आरोग्य विमा नक्कीच घ्यावा, असा सल्ला लँडर 7 फायनॅन्शिअल अॅडव्हायझर्सचे फाऊंडर सुरेश सदगोपन यांनी दिला.
(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Just started a job know how to become financially capable investment tips and tricks know more details insurance shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.