Join us  

करवा चौथला पत्नीला महागड्या वस्तूंपेक्षा 'हे' गिफ्ट ठरेल बेस्ट; पुढचं आयुष्य जाईल सुखात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:09 AM

karwa Chauth Gift: करवा चौथ सणाच्या दिवशी पती आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू देत असतो. मात्र, तुम्ही भौतिक वस्तू देण्याऐवजी जर आर्थिक भेटवस्तू दिली तर भविष्यात आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होईल.

karwa Chauth Gift : उत्तरेकडच्या राज्यात साजरा केला जाणारा 'करवा चौथ' सण आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा दिवस विवाहित महिलांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या सणात करवा चौथच्या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी उपवास ठेवतात आणि चंद्र उगवल्यानंतर संध्याकाळी उपवास पूर्ण करतात. सणासुदीच्या काळात दिवाळीच्या काही दिवस आधी हा सण येतो, त्यामुळे या काळात पती अनेकदा आपल्या पत्नीला भेटवस्तू देतात. तुमच्या मनात असाच विचार असेल तर आर्थिक भेटवस्तूंद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला खुश करू शकता.

गोल्ड बाँड किंवा ईटीएफप्रत्यक्षात सोने घेण्याऐवजी तुम्ही सोन्यात गुंतवणूक करुन उत्तम परतावा मिळवू शकता. तुमच्याकडे गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बाँड सारखे पर्याय आहेत. तुम्ही ते खरेदी करुन तुमच्या पत्नीला भेट म्हणून देऊ शकता. सोने ही अशी वस्तू आहे की ती केवळ दागिने म्हणून देण्याऐवजी गुंतवणूक म्हणून घेतली तर ती मजबूत परतावा देते. तुमच्या पत्नीला आर्थिक स्थैर्यही देऊ शकते.

पत्नीच्या नावे इक्विटी किंवा शेअर्समध्ये गुंतवणूकसध्या भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण असून वर्षभरापूर्वीही गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम अनेक शेअर्समध्ये जवळपास दुप्पट झाली आहे. करवा चौथ ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर चांगले शेअर्स खरेदी करू शकता.

म्युच्युअल फंडात एसआयपीतुम्ही चांगली आर्थिक भेट शोधत असाल तर म्युच्युअल फंड बेस्ट पर्याय आहे. गेल्या काही वर्षात कोट्यवधी गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. यामध्ये शेअर मार्केटची जोखीम कमी असून चांगला परतावा मिळतो.

पीपीएफ सारख्या बँकेत गुंतवणुकीचा पर्यायतुम्ही तुमच्या पत्नीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडू शकता. या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा करुन EEE चा लाभ मिळवू शकता. तुमच्या पत्नीलाही चांगले रिटर्न मिळतील आणि तुम्हाला कर सवलती देखील मिळू शकते.

जीवन विमा किंवा टर्म प्लॅनसारखे पर्यायजीवन विमा किंवा टर्म प्लॅनसारखे पर्याय नेहमीच कुटुंबाच्या गरजांसाठी असतात. जर तुम्ही हे गुंतवणूक उत्पादन तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षा कवच म्हणून घेतले तर तुमच्या पत्नीला तसेच संपूर्ण कुटुंबाला सुरक्षिततेचा पर्याय मिळेल.

आर्थिक गिफ्टचं का द्यावे?सोन्याचे दागिने, कपडे किंवा इतर महागड्या वस्तूंपेक्षा आर्थिक भेटवस्तू भविष्यात आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करतील. पत्नीच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एक भक्कम पाया उभा करण्यासाठी ही भेट खूप उपयुक्त ठरेल. 

टॅग्स :गुंतवणूकपीपीएफसोनं