लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. अशीच एक बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होतील. जोखीममुक्त योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय अधिक चांगला ठरू शकतो.पैसे केले दुप्पटकिसान विकास पत्र नावाच्या या योजनेत गुंतवणूक करणार्या कोणत्याही गुंतवणूकदाराला चांगलं व्याज मिळतं. तसंच दीर्घ मुदतीत पैसे दुप्पटही होतात.किती मिळतं व्याजया सरकारी योजनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ७.५ टक्के व्याज दिलं जाणार आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना चक्रवाढीचा लाभही मिळतो, त्यामुळे ही योजना अल्प बचत करणाऱ्यांसाठीही चांगली असल्याचं म्हटलं जातं. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता.किती रुपयांपासून सुरुवातपोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत कोणतीही व्यक्ती फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.१० लाखांचे होतील २० लाखजर कोणत्याही गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे दुप्पट करायचे असतील तर किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळेल. जर तुम्ही त्यात दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत वीस लाख रुपयांचा परतावा मिळेल. लोकांना कमी रक्कम गुंतवूनही मोठा परतावा मिळाला आहे.
Post Office ची 'ही' जबरदस्त स्कीम माहितीये? केवळ ११५ महिन्यांत होतील पैसे डबल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 12:57 PM