Lokmat Money >गुंतवणूक > KVP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमवर मिळतंय एफडीप्रमाणे व्याज, जाणून घ्या फायदे आणि तोटे

KVP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमवर मिळतंय एफडीप्रमाणे व्याज, जाणून घ्या फायदे आणि तोटे

सध्या यावर पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टाइम डिपॉजिट स्कीम इतकं व्याज दिलं जातंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:05 AM2023-09-11T11:05:10+5:302023-09-11T11:06:40+5:30

सध्या यावर पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टाइम डिपॉजिट स्कीम इतकं व्याज दिलं जातंय.

kisan vikas patra post office scheme earns interest like fixed deposit know the pros and cons details | KVP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमवर मिळतंय एफडीप्रमाणे व्याज, जाणून घ्या फायदे आणि तोटे

KVP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमवर मिळतंय एफडीप्रमाणे व्याज, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना (Post Office Small Saving Schemes) चालवल्या जातात. यामध्ये गुंतवणूक करणं पूर्णपणे सुरक्षित आहे. गुंतवणूकदारांनाही या योजनांमध्ये उत्तम व्याज मिळतं. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसद्वारे एक योजना देखील चालविली जाते ज्यामध्ये पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) असं या योजनेचं नाव आहे. 

सध्या किसान विकास पत्रावर वार्षिक ७.५ टक्के व्याज देण्यात येत आहे. हा दर पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टाईम डिपॉझिट स्कीम इतका आहे. सध्याच्या व्याजदरानुसार, किसान विकास पत्र योजनेतील पैसे ११५ महिन्यांत म्हणजे १० वर्षे आणि ३ महिन्यांत दुप्पट होत आहेत. दरम्यान, यात गुंतवणूक करण्याचे काही तोटे देखील आहेत. अशा स्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेतले पाहिजेत.

वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम
किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाईम इनव्हेस्टमेंट स्कीम आहे. या ठिकाणी तुमचे पैसे एका निश्चित कालावधीत दुप्पट होतात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. केंद्र सरकारनं किसान विकास पत्रावरील व्याज १ एप्रिल २०२३ पासून वार्षिक ७.२ टक्क्यांवरून ७.५ टक्के केलं आहे.

कोण करू शकतं गुंतवणूक
किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. सिंगल अकाऊंट व्यतिरिक्त जॉइंट अकाउंटचीही यात सुविधा आहे. त्याच वेळी, ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी १००० रुपये, ५००० रुपये, १०,००० रुपये आणि ५०,००० रुपयांपर्यंतची सर्टिफिकेट्स खरेदी करता येतात.

टॅक्सचा फायदा नाही
किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत, तुम्हाला योजनेत जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर लाभ मिळत नाही.

Web Title: kisan vikas patra post office scheme earns interest like fixed deposit know the pros and cons details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.