Join us

SBI ची कोट्यवधी ग्राहकांसाठी खास स्कीम, काही वर्षातच ५ लाखांचे होतील १० लाख, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 12:54 PM

तुम्ही स्वतःसाठी जोखीममुक्त गुंतवणूक शोधत आहात का? सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देत आहे.

SBI Scheme: तुम्ही स्वतःसाठी जोखीममुक्त गुंतवणूक शोधत आहात का? सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर देत आहे. यामध्ये ग्राहकांचे पैसे काही वर्षांत दुप्पट होऊ शकतात. SBI WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

किती आहे व्याजदर? 

बँक कोणत्याही एफडीवर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना ०.५० अधिक व्याज देते. एसबीआय वी केअरवर ७.५०% व्याज मिळत आहे. योजनेअंतर्गत गुंतवणूक किमान ५ वर्षे आणि कमाल १० वर्षांसाठी केली जाते. हे दर नवीन आणि रिन्यू होणाऱ्या एफडीवर उपलब्ध असतील. तुम्ही ५ लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला थेट मॅच्युरिटीवर १० लाख रुपये मिळतील. वी केअर एफडी योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. बँक यावर उत्तम व्याज देत आहे.  

५ लाखांच्या गुंतवणूकीवर १० लाख 

सध्या, एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. पाहिल्यास, या व्याजदरानं यातील पैसा १० वर्षांत दुप्पट होईल. म्हणजेच, जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी १० लाख रुपये मिळू शकतात. ५ लाखांसाठी, तुम्हाला १० वर्षात व्याज म्हणून ५.५ लाख रुपये मिळतील. बँक नियमित एफडीवर 10 वर्षांसाठी ६.५ टक्के व्याज देत आहे. एसबीआय त्यांच्या एफडीवर वर ३.५० टक्के ते ७.६० टक्के व्याज देते.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूक