Join us  

महिन्याला केवळ १००० रूपये गुंतवून मिळू शकतं २० हजारांचं पेन्शन, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 9:26 PM

सरकारने जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली करण्यात आले. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पेन्शन योजनांमध्ये NPS सर्वात आकर्षक योजना आहे.

तुम्ही रिटायरमेंटचे प्लॅनिंग केले आहे का? नसेल तर लवकर करा. कारण तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितका तुमचा सेवानिवृत्ती निधी मोठा असेल. तुम्हाला या गुंतवणुकीसाठी अधिक वेळ मिळेल, जेणेकरून तुमचे मासिक योगदानही जास्त होणार नाही. आम्ही तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) बद्दल सांगत आहोत. ही शासनाची योजना आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही.

सरकारने जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली करण्यात आले. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पेन्शन योजनांमध्ये NPS सर्वात आकर्षक योजना आहे. ही सरकारी योजना असल्याने त्यातील अटी व शर्थी स्पष्ट आहेत. NPS किंवा PFRDA च्या वेबसाईटवर तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती मिळवू शकता.

फक्त 1000 रुपये जमा करून NPS मधून दरमहा 20,000 रुपये पेन्शन कसे मिळवू शकता हे आपण एका उदाहरणाच्या मदतीने समजू घेऊ. समजा तुमचं वय आता २० वर्षे आहे. नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. जर तुम्ही दरमहा 1000 रुपये गुंतवले, तर निवृत्तीच्या वयापर्यंत (60 वर्षे) तुमचं एकूण 5.4 लाख रुपयांचे योगदान होईल. या पैशावर 10 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरला तर तुमची एकूण गुंतवणूक 1.05 कोटी होईल. एनपीएस ग्राहकाला आपल्या फंडाच्या 40 टक्के हिस्स्याचा वापर एन्युटी खरेदी करण्यासाठी करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला 42.28 लाखांचा वापर एन्युटी खरेदी करण्यासाठी करावा लागेल. वार्षिक 10 वर्षे रिटर्ननुसार तुमचं मासिक पेन्शन 21,140 रूपये होईल आणि तुम्हाला 63.41 लाख रुपये एकरकमी मिळतील.

तररक्कमअधिकअसेलजर एखाद्या ग्राहकाने त्याचे उत्पन्न वाढत असताना NPS मध्ये त्याचे योगदान वाढवत राहिल्यास, निवृत्तीनंतर त्याला मिळणारी एकरकमी रक्कम आणि पेन्शन आणखी जास्त असेल. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता. यासाठी तुम्हाला https://www.npstrust.org.in/content/pension-calculator वर जावे लागेल. तुमच्या क्षमतेनुसार योगदानाची रक्कम निवडून तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळणारी रक्कम जाणून घेता येईल.

टॅग्स :निवृत्ती वेतनगुंतवणूक