गुंतवणूकीसाठी लोक अनेक पर्यायांचा वापर करतात. यापैकी एक म्हणजे कर्मचारी भविष्य निधी. रिटायरमेंटनंतर पेन्शनच्या रुपात पैसा मिळत राहावा यासाठी यात गुंतवणूक केली जाते. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघंही गुंतवणूक करतात. या फंडात दर महिन्याला आपल्या वेतनातून १२ टक्के आणि १२ टक्के कंपनीद्वारे दिले जातात. यामध्ये गुंतवणूकीवर सरकारद्वारे व्याजही दिलं जातं. परंतु वेळेपूर्वी पैसे काढल्यास यावर टॅक्सही (EPF Withdrawal Rules) द्यावा लागतो.
केव्हा लागतो टॅक्स?
पीएफमधून पैसे काढताना (EPF Withdrawal Rules) काही अटींचं पालन करावं लागतं. तसा फंड रिटायरमेंटनंतरच काढता येतो. परंतु एखाद्याला हवं असल्यास ही रक्कम वेळेपूर्वीही काढता येते. यासाठी त्यांना टॅक्सही भरावा लागतो. रिटायरमेंटच्या पूर्वी यातून ९० टक्के रक्कम काढता येऊ शकते.
केव्हा काढता येते पूर्ण रक्कम?
जेव्हा एखादी व्यक्ती आपली नोकरी गमावते, तेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या पीएफ फंडातून ७५ टक्के रक्कम काढू शकतो. यानंतर व्यक्ती दुसऱ्यांदा संपूर्ण रक्कम काढू शकते. पीएफ फंडातून पैसे काढण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतरच अटींचं पालन करून पीएफमधून पैसे काढता येतील.
केव्हा टीडीएस लागत नाही?
आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा दावा केला जाऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीत पाच वर्षे काम करण्यापूर्वी पीएफमधून पैसे काढते तेव्हा त्या रकमेवर टीडीएस कापला जातो. पाच वर्षांच्या नोकरीनंतर पीएफमधून पैसे काढले तर कोणताही कर आकारला जाणार नाही.
EPF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम, अन्यथा होऊ शकतं नुकसान
गुंतवणूकीसाठी लोक अनेक पर्यायांचा वापर करतात. यापैकी एक म्हणजे कर्मचारी भविष्य निधी.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:04 PM2023-10-13T13:04:42+5:302023-10-13T13:05:27+5:30