SBI Special FD: पैसे गुंतवण्यासाठी अनेकजण शेअर बाजाराऐवजी मुदत ठेवींना (FD) प्राधान्य देतात. शेअर बाजारातील चढ-उतारांच्या तुलनेत एफडीच्या गुंतवणूकदारांना निश्चित परतावा देते. बँका वेळोवेळी विशेष एफडी सुरू करत असतात. त्यांना नियमित एफडीपेक्षा थोडा जास्त परतावा मिळतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अशा दोन खास एफडी आहेत. त्यावर ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. त्यात गुंतवणूक करायची असेल आता फार कमी वेळ शिल्लक आहे. गुंतवणुकीची शेवटची तारीख ३१ मार्च आहे.
एसबीआयच्या या दोन खास एफडींची नावं एसबीआय अमृत सृष्टी आणि एसबीआय अमृत कलश अशी आहेत. वास्तविक, एसबीआय विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी अनेक खास एफडी योजना चालवते. या एफडी योजना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केल्या जातात. विशेष एफडीमध्ये गुंतवणूक ठराविक काळासाठीच केली जाते. त्यानंतर या योजना संपुष्टात येतात.
एसबीआय अमृत सृष्टी
एसबीआय अमृत सृष्टी ही एक विशेष एफडी योजना आहे जी ४४४ दिवसांसाठी आहे. या योजनेत सर्वसामान्यांना ७.२५ टक्के वार्षिक व्याज मिळतं. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळतं. या एफडी योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करू शकता.
परतावा किती मिळणार?
जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर ४४४ दिवसांनंतर म्हणजे मॅच्युरिटीनंतर ही रक्कम १०९२६६ रुपये होईल. म्हणजेच ९२६६ रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना १०९९३६ रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे जर तुम्ही यात २ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीनंतर ही रक्कम २१८५३२ रुपये होईल. म्हणजेच व्याजापोटी तुम्हाला १८५३२ रुपये मिळतील. ज्येष्ठ नागरिकांना मुदतपूर्तीनंतर २१९८५९ रुपये मिळणार आहेत.
एसबीआय अमृत कलश
एसबीआय अमृत कलश ही आणखी एक विशेष एफडी योजना आहे जी ४०० दिवसांसाठी आहे. या योजनेवर वार्षिक ७.१० टक्के व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांना या एफडी योजनेत ७.६० टक्के व्याज मिळतं. यामध्ये तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करू शकता.
परतावा किती मिळणार?
जर तुम्ही या योजनेत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ४०० दिवसांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीनंतर ही रक्कम १०७७८१ रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच व्याजापोटी तुम्हाला ७७८१ रुपये मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना १०८३२९ रुपये मिळणार आहेत.
दुसरीकडे जर तुम्ही यात २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीनंतर ही रक्कम २१५५६२ रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच तुम्हाला १५५६२ रुपये व्याज म्हणून मिळतील. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटीवर २१६६५८ रुपये मिळणार आहेत.