Join us

SBI च्या 'या' विशेष स्कीम्समध्ये गुंतवणूकीसाठी उरेलत अखेरचे काही दिवस; मिळतंय अधिक व्याज, रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:18 AM

तुम्हीही स्टेट बँकेच्या(SBI) या विशेष स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्याकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत वेळ आहे.

SBI Bank 31 March 2024 Financial Deadline: तुम्हीही स्टेट बँकेच्या(SBI) या विशेष स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्याकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत वेळ आहे. दरम्यान, एसबीायच्या अमृत कलश योजना आणि एसबीआय WeCare या दोन विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. जर तुम्ही कमी वेळेत जास्त परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. 

एसबीआय अमृत कलश योजना 

एसबीआयची अमृत कलश योजना ही एक विशेष एफडी योजना आहे. बँक त्यावर ७.१० टक्के व्याज देत आहे. ही फक्त ४०० दिवसांची एफडी असून त्यावर ७.१० टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच, ते तुम्हाला कमी कालावधीच्या एफडीमध्ये अधिक व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणीही अमृत कलश विशेष योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि खात्रीशीर परतावा मिळवू शकतो. एसबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, अमृत कलश एफडी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाहीनुसार व्याज घेऊ शकतात. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, अमृत कलश एफडी योजनेत जमा केलेले पैसे ४०० दिवसांच्या कालावधीपूर्वी काढले गेल्यास, बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा ०.५०% ते १% कमी व्याजदर दंड म्हणून कापू शकते. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. 

एसबीआय WeCare एफडी 

एसबीआयनं अलीकडेच WeCare एफडी योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत असल्याचं सांगितलं आहे. एसबीआय त्यांच्या WeCare एफडीवर ग्राहकांना सर्वोत्तम व्याज देत आहे. बँक कोणत्याही एफडीवर सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना ०.५० अधिक व्याज देते. एसबीआय Wecare वर ७.५% व्याज मिळत आहे. योजनेअंतर्गत गुंतवणूक किमान ५ वर्षे आणि कमाल १० वर्षांसाठी केली जाऊ शकते. हे दर नवीन आणि रिन्यू होणाऱ्या एफडीवर उपलब्ध असतील.

टॅग्स :एसबीआयगुंतवणूक