Join us

SBIच्या मालामाल करणाऱ्या या स्कीममध्ये गुंतवणूकीसाठी उरले अखेरचे काही दिवस, संधी सोडू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 2:09 PM

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या स्पेशल स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी अखेरचे काही दिवस उरले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट अमृत कलश स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी अखेरचे काही दिवस उरले आहेत. या स्कीमची इन्व्हेस्टमेंट डेडलाईन जवळ आली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी आता गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं. सर्व वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि बँक मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर गुंतवणूकीवर मिळणारं व्याज देते.

स्टेट बँक त्यांच्या गुंतवणूकदारांना या डिपॉझिट स्कीममध्ये ४०० दिवसांच्या गुंतवणुकीच्या कालावधीसह अधिक व्याज देते. या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. गेल्या वेळी गुंतवणुकीची मुदत जूनमध्ये वाढवण्यात आली होती. सामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिक देखील एसबीआयच्या या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु दोन्ही कॅटेगरीमध्ये व्याजदर मात्र निरनिराळे निश्चित करण्यात आलेत.

किती मिळतंय व्याज?स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेनं विशेष एफडी स्कीम अमृत कलशवर सामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतलाय. तर, बँकेनं ४०० दिवसांच्या कालावधीसह या एफडी स्कीमवर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर देण्याची घोषणा करण्यात आलीये.

व्याजाचे नियमयामध्ये गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. टीडीएस कापूस व्याजाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय मुदतीपूर्वी जर रक्कम काढली तर डिपॉझिटच्या वेळी असलेल्या व्याजदरापासून ०.५० ते १ टक्के पेनल्टी आकारली जाते.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूक