Lokmat Money >गुंतवणूक > LIC Aadhaar Shila: रोज फक्त २९ रुपये... अन् जमा होईल ४ लाखांचा फंड; महिलांसाठी गुंतवणुकीची जबरदस्त संधी

LIC Aadhaar Shila: रोज फक्त २९ रुपये... अन् जमा होईल ४ लाखांचा फंड; महिलांसाठी गुंतवणुकीची जबरदस्त संधी

महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 08:57 PM2022-09-16T20:57:04+5:302022-09-16T20:57:48+5:30

महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे.

LIC Aadhaar Shila save Only 29 rupees daily will get 4 lakh fund will be accumulated Tremendous investment opportunity for women profit | LIC Aadhaar Shila: रोज फक्त २९ रुपये... अन् जमा होईल ४ लाखांचा फंड; महिलांसाठी गुंतवणुकीची जबरदस्त संधी

LIC Aadhaar Shila: रोज फक्त २९ रुपये... अन् जमा होईल ४ लाखांचा फंड; महिलांसाठी गुंतवणुकीची जबरदस्त संधी

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची आधारशिला योजना गुंतवणूकदारांना सर्वात कमी गुंतवणुकीत मोठा निधी देते. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. महिला हळू हळू थोडे पैसे वाचवून आणि LIC च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकतात. 8 ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज 29 रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात. तर जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती.

आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊ. तुम्ही दररोज 29 रुपये वाचवल्यास, तुम्ही एलआयसी आधारशिलामध्ये 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी हे सुरू केले. तर तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी 2,14,696 रुपये जमा कराल. परंतु मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,97,000 रुपये मिळतील.

काय आहेत अटी?
LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, अशा महिलाच याचा लाभ घेऊ शकतात. एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर पैसेही मिळतात.

इतकीच करावी लागेल गुंतवणूक
एलआयसी आधार शिला प्लॅन अंतर्गत बेसिक सम अश्योर्ड मिनिमम 75000 रूपये आणि कमाल 3 लाख रूपये आहे. पॉलिसीचा किमान कालावधी 10 वर्षे आणि कमाल कालावधी 20 वर्षे आहे. यात 8 ते 55 या वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. तसंच कमाल मॅच्युरिटीची मर्यादा 70 वर्षे आहे. तु्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमिअम भरू शकता.

Web Title: LIC Aadhaar Shila save Only 29 rupees daily will get 4 lakh fund will be accumulated Tremendous investment opportunity for women profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.