Join us

LIC New Scheme : LIC ने आणली नवीन स्कीम, निवृत्तीनंतरही मिळणार वैद्यकीय लाभ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 8:39 PM

LIC New Scheme : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं नवीन योजना सादर केली आहे.

LIC New Scheme : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (LIC) ग्रुप पोस्ट रिटायरमेंट मेडिकल बेनिफिट स्कीम नावाची नवीन योजना सादर केली आहे. ही योजना २ मे २०२३ पासून लागू झाली आहे. ही योजना ५० किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कोणत्याही एम्पलॉयरसाठी उपलब्ध आहे. या योजनेशिवाय एलआयसी आपल्या ग्राहकांना ११ ग्रुप प्रोडक्ट आणि ग्रुप ॲक्सिडेंट बेनिफिट राइडरदेखील ऑफर करते.

एलआयसी ग्रुप रिटायरमेंट पोस्ट मेडिकल बेनिफिट स्कीम ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाईफ, ग्रुप सेव्हिंग इन्शुरन्स प्रोडक्ट आहे. एलआयसीच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत कर्मचारी निवृत्तीनंतर वैद्यकीय लाभ घेऊ शकतील. ही योजना कर्मचार्‍यांच्या मेडिकल बेनिफिटशी निगडीत एम्पलॉयरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास मदत करते.

लाईफ कव्हर बेनिफिट

हा प्लॅन कर्मचाऱ्यांना एक फिक्स्ड लाईफ कव्हर बेनिफिटही देते. कोणताही एम्पलॉयर, जो आपल्या कर्मचाऱ्यांच्या बेनिफिटसाठी फंड देऊ इच्छित असतील त्यांना या स्कीमसाठी अर्ज करता येऊ शकतो. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३० नुसार कंपनीनं २ मे २०२३ पासून आपला नवा प्रोडक्ट लाँच करण्याची घोषणा केली आहे, असं एलआयसीनं एका रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटलंय.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक