Join us

LIC नं आणली स्मार्ट पेन्शन स्कीम; केवळ एकदा द्यावा लागेल प्रीमिअम, वाचा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:35 IST

LIC Smart Pension Plan: जर तुम्ही निवृत्त असाल किंवा निवृत्तीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) आपली नवी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे.

LIC Smart Pension Plan: जर तुम्ही निवृत्त असाल किंवा निवृत्तीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) आपली नवी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. निवृत्त होणाऱ्या किंवा निवृत्त होण्याची योजना आखणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.

ही योजना नॉन-पार्टिसिपेटिंग प्लॅन, नॉन-लिंक्ड, पर्सनल किंवा ग्रुप, बचत, इंटरमीडिएट वार्षिक योजना आहे. या योजनेमुळे वृद्धांचा आर्थिक ताण कमी होऊ शकतो. पॉलिसीधारकांना लवचिकता आणि संरक्षण प्रदान करून सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ अॅन्युइटी या दोन्हींसाठी विविध प्रकारचे याद्वारे मिळणार आहेत.

योजनेची खास वैशिष्ट्ये

वयाची पात्रता :

या स्कीममध्ये एन्ट्रीचं किमान वय १८ वर्षे आहे, ज्यामुळे तरुण गुंतवणूकदार लवकर नियोजन करू शकतात. निवडलेल्या अॅन्युइटी पर्यायानुसार एन्ट्रीचं कमाल वय ६५ ते १०० वर्षे आहे.

फ्लेक्सिबल अॅन्युइटी ऑप्शन:

सिंगल लाइफ अॅन्युइटी : ही अॅन्युइटी पेआउट आयुष्यभराची तरतूद करते.जॉईंट लाइन अॅन्युइटी: प्रायमरी अॅन्युइटन्ट आणि सेकंडरी अॅन्युइटटन्ट (जसे की जोडीदार) दोघांसाठी अॅन्युइटी सुरू राहील, याची खात्री केली जाते.

इन्सेन्टिव्हचीही सुविधा - सध्याच्या एलआयसी पॉलिसीधारकांच्या नॉमिनी आणि लाभार्थींसाठी हायर अॅन्युइटी रेट दिला जातो. ज्यामुळे ही योजना अतिशय लाभदायक बनते. याशिवाय ही पॉलिसी काही अटींसह पार्शिअल अथवा पूर्ण विड्रॉलचा पर्यायही देते, यामुळे पॉलिसीधाकांना गरज भासल्यास फायनान्शिअल फ्लेक्सिबलिटी मिळते.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक