Lokmat Money >गुंतवणूक > LIC Pension Scheme : फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम

LIC Pension Scheme : फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम

LIC Pension Scheme : एलआयसीच्या या स्कीममध्ये तुम्हाला उत्तम परतावा तर मिळतोच, त्याशिवाय आणखीही अनेक बेनिफिट्स मिळतात. पाहूया कोणती आहे ही स्कीम.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:15 AM2024-09-26T10:15:38+5:302024-09-26T10:16:33+5:30

LIC Pension Scheme : एलआयसीच्या या स्कीममध्ये तुम्हाला उत्तम परतावा तर मिळतोच, त्याशिवाय आणखीही अनेक बेनिफिट्स मिळतात. पाहूया कोणती आहे ही स्कीम.

LIC Pension Scheme Invest money only once Live life tension free get lifetime pension of rs 1 lakh fabulous Scheme of LIC | LIC Pension Scheme : फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम

LIC Pension Scheme : फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम

LIC Pension Scheme : अनेक जण आता भविष्याचा विचार करून गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. नोकरीदरम्यान आपल्या निवृत्तीसाठी मोठं प्लॅनिंग करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण बहुतांश लोक पैशांअभावी हे काम करू शकत नाहीत. आजच्या काळात लोक रिटायरमेंट प्लॅनमध्ये म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीबाबत (Mutual Fund Investment) अधिक सक्रिय आहेत आणि आपल्या कमाईचा काही भाग गुंतवत आहेत. 

मात्र, ही म्युच्युअल फंडाची स्कीम (Mutual Fund Scheme) बाजारपेठेशी जोडलेली असल्यामुळे त्यात जोखीम अधिक असते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला नियमित उत्पन्नाची हमी मिळेल आणि प्रत्येक महिन्याला किंवा सहामाही आधारावर पैसे जमा करावे लागणार नाहीत. एकदाच पैसे गुंतवून तुम्हाला मोठं पेन्शन मिळू शकतं.

एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅन 

ही स्कीम एलआयसीद्वारे चालवली जाते, ज्याअंतर्गत नियमित उत्पन्नाची हमी दिली जाते आणि आपले पैसेदेखील सुरक्षित असतात. या योजनेला एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅन (LIC New Jeevan Shanti Plan) म्हणतात. या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि आयुष्यभरासाठी पेन्शन मिळते. 

एलआयसीकडे सर्व वयोगटातील लोकांसाठी एक नव्हे तर अनेक उत्तम पॉलिसी आहेत. निवृत्तीच्या अनेक योजना प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे निवृत्तीनंतर लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते आणि कधीही पैशांची कमतरता भासू देत नाही. एलआयसी नवीन जीवन शांती योजना देखील अशीच योजना आहे. ही सिंगल प्रीमियम योजना आहे आणि एकरकमी गुंतवणुकीद्वारे निवृत्तीनंतर नियमित पेन्शनची हमी देते. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी १ लाख रुपये पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळेल.

काय आहे खास?

या पेन्शन पॉलिसीसाठी कंपनीनं ३० वर्षे ते ७९ वर्षांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. या योजनेत गॅरंटीड पेन्शनसोबतच इतर सर्व प्रकारचे फायदेही मिळतात. ही योजना खरेदी करण्यासाठी दोन पर्याय आहेत, पहिला सिंगल लाइफसाठी डेफर्ड अॅन्युइटी आणि दुसरा जॉइंट लाइफसाठी डेफर्ड अॅन्युइटी. म्हणजेच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा हवं असेल तर कंबाइन ऑप्शन निवडू शकता.

आता एलआयसीच्या या नवीन जीवन शांती योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर १,००,००० रुपयांचे वार्षिक पेन्शन कसं मिळवता येईल हे पाहू. म्हटल्याप्रमाणे हा एक अॅन्युइटी प्लॅन आहे आणि तो खरेदी करून तुम्ही त्यात तुमची पेन्शन लिमिट ठरवू शकता. निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर निश्चित पेन्शन मिळत राहील. तसंच गुंतवणुकीवर उत्तम व्याज मिळते.

दरमहाही मिळू शकतो लाभ

पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर जर एखाद्या ५५ वर्षीय व्यक्तीनं एलआयसी न्यू जीवन शांती योजना खरेदी करताना ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ती पाच वर्षे राहिल आणि ६० वर्षांनंतर त्याला दरवर्षी १,०२,८५० रुपये पेन्शन मिळण्यास सुरवात होईल. तुम्हाला हवं असेल तर ही रक्कम सहा महिन्यांत किंवा दर महिन्यालाही घेऊ शकता.

जर तुम्हाला दर सहा महिन्यांनी ही रक्कम हवी असेल तर ११ लाख रुपयांच्या एका गुंतवणुकीवर तुम्हाला १ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक पेन्शन मिळते, मग दर सहा महिन्यांनी घ्यायची असेल तर ती रक्कम ५०,३६५ रुपये असेल. दर महिन्याला पेन्शनचा हिशोब केला तर या गुंतवणुकीवर दरमहा ८,२१७ रुपये पेन्शन कन्फर्म होईल.

आणखी कोणते बेनिफिट्स?

पेन्शनसोबतच एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत गॅरंटीड पेन्शनसोबतच जे इतर फायदे मिळतात त्यात डेथ कव्हरचाही समावेश आहे. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यातील संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते. ११ लाखांच्या गुंतवणुकीवर नॉमिमीला मिळणारी रक्कम १२,१०,००० रुपये असेल. विशेष म्हणजे हा प्लॅन तुम्ही केव्हाही सरेंडर करू शकता. त्यात कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता, तर त्यासाठी कमाल मर्यादा नाही.

Web Title: LIC Pension Scheme Invest money only once Live life tension free get lifetime pension of rs 1 lakh fabulous Scheme of LIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.