LIC New Jeevan Shanti Policy: तुम्हाला तुमचे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. LIC ने एक उत्तम योजना आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही वृद्धापकाळाचा खर्च सहज भागवू शकता. एलआयसीने (LIC Policy) एक नवीन आणि जबरदस्त पॉलिसी जीवन शांती पॉलिसी (New Jeevan Shanti Policy) लाँच केली आहे. एकदा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला आजीवन हमीसह पेन्शन मिळेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचा खर्च सहज भागवू शकता.
जीवन शांती पॉलिसी एलआयसीच्या जुन्या प्लॅन जीवन अक्षय योजनेसारखीच आहे. तुमच्याकडे जीवन शांती पॉलिसीमध्ये दोन पर्याय असतील. पहिला पर्याय म्हणजे इमिडिएट अॅन्युइटी आणि दुसरा म्हणजे डेफर्ड अॅन्युइटी. हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. पहिल्या म्हणजेच इमिडिएट अॅन्युइटी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शनची सुविधा उपलब्ध होते. दुसरीकडे, डिफर्ड अॅन्युइटीच्या पर्यायामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर ५, १०, १५ किंवा २० वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचं पेन्शन लगेच सुरू करू शकता.
असं बनेल पेन्शन
या प्लॅन अंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित केलेली नाही. तुमची गुंतवणूक, वय आणि स्थगिती कालावधीनुसार तुम्हाला तुमचे पेन्शन मिळेल. गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल किंवा वय जितके जास्त होईल तितके तुम्हाला पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार LIC पेन्शन देते.
कोणाला मिळेल फायदा?
LIC च्या या प्लॅनचा लाभ किमान ३० वर्षे आणि कमाल ८५ वर्षे वयाच्या व्यक्ती घेऊ शकतात. दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना गॅरंटीड वार्षिक दर दिले जातील. प्लॅन अंतर्गत विविध अॅन्युइटी पर्याय आणि अॅन्युइटी पेमेंटचे मोड उपलब्ध आहेत. परंतु ही पॉलिसी घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की एकदा निवडलेला पर्याय बदलता येणार नाही. हा प्लॅन ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी करता येईल.
(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)