Join us  

LIC ची पॉलिसी लॅप्स झाली? अशी करा पुन्हा सुरू, कंपनी देतेय ४००० रुपयांपर्यंतची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 4:22 PM

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननं म्हणजेच एलआयसीनं एक विशेष मोहीम सुरू केली आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननं म्हणजेच एलआयसीनं एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ते एक्सपायर झालेल्या पॉलिसी (LIC Policy) पुन्हा रिअॅक्टिव्हेट करण्याची संधी देण्यात येत आहे. एलआयसीचे हे पाऊल लोकांना त्यांचे रिस्क कव्हर सुरू ठेवण्यास मदत करेल. ही विशेष पुनरुज्जीवन मोहीम १ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्टही शेअर केली आहे.

लॅप्स पॉलिसीला सुरू करण्यासाठी, एलआयसी ग्राहकांना विलंब शुल्कावर ३० टक्क्यांची मोठी सूट देत आहे. यासाठी एलआयसीच्या लॅप्स झालेल्या पॉलिसी निवडल्या जात आहेत. यात अशा पॉलिसी निवडल्या जात आहेत ज्यांचा शेवटचा न भरलेला प्रीमियम ५ वर्षांपेक्षा जास्त जुना नाही. कोणत्या अटींनुसार या पॉलिसीधारकांना लाभ द्यायचा याची निवड केली जाणार आहे.

कुठे मिळेल माहिती?यासंदर्भात एलआयसीकडून सोशल मीडियावर एक पोस्टही करण्यात आली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार, याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही एलआयसी शाखेला भेट देऊ शकता किंवा कोणत्याही एजंटशी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही एलआयसीच्या http://licindia.in वेबसाइटलाही भेट देऊ शकता.मोठी सूटकंपनीकडून विलंब शुल्कावर ३० टक्के सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमसह पॉलिसीवर ३ हजार रुपयांची सूट मिळेल. जर तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम १ लाख ते ३ लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला सुमारे ३५०० रुपयांची सूट मिळेल. ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पॉलिसींवर, तुम्हाला विलंब शुल्कामध्ये ४००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. लॅप्स पॉलिसी रिअॅक्टिव्हेट करताना, शुल्क भरावं लागेल, परंतु तुम्हाला यावर मोठी सूटही दिली जात आहे.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक