Join us  

LIC Saral Pension Yojana: जर ५० हजारांपर्यंत पेन्शन हवं असेल तर या योजनेत करा गुंतवणूक, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 12:52 PM

LIC Saral Pension Yojana: एलआयसी अनेक प्रकारच्या पॉलिसी ऑफर करते. पाहा कोणता आहे हा प्लॅन.

LIC Saral Pension Yojana: एलआयसी अनेक प्रकारच्या पॉलिसी ऑफर करत आहे. जर तुम्हीही आयुष्यभर कमावण्याचा प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळू शकतात. एलआयसीच्या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना आहे. या योजनेत तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षापासूनच पेन्शन मिळू शकते. जाणून घेऊ या योजनेबद्दल अधिक माहिती.

ही एकप्रकारची सिंगल प्रीमिअम योजना आहे. यामध्ये तुम्हाला केवळ एकदाच प्रीमिअम भरावा लागणार आहे. जर या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर पैसे म्हणजेच प्रीमिअम नॉमिनीला परत केले जाईल. सरल पेन्शन योजना एक वार्षिक योजना आहे, याचा अर्थ पॉलिसी घेतल्यावर लगेच तुम्हाला पेन्शन सुरू होते. पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला जितकं पेन्शन मिळतं तितकंच तुम्हाला ते आयुष्यभरासाठी मिळत जातं.

एकदाच प्रीमिअमही एक अशी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कमी कालावधीतही पेन्शनचा लाभ मिळू शकतो. यासाठी वयाच्या ६० वर्षापर्यंत थांबण्याची गरज नाही. वयाच्या ४० व्या वर्षापासून पेन्शन मिळू लागते. या प्लॅनमध्ये, पॉलिसी घेताना तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. या स्कीम अंतर्गत एन्युटी मिळवण्यासाठी २ पर्यायांपैकी एक कोणताही पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहते.

कायआहेतप्रकार?सिंगल लाईफ पॉलिसी कोणत्या एका व्यक्तीच्या नावावर असते. पॉलिसी होल्डरला रक्कम पेन्शनच्या रुपात मिळत राहते. पेन्शन होल्डरच्या मृत्यूनंतर बेस प्रीमिअमची रक्कम नॉमिनीला परत केली जाते.

जॉईंट लाइफ पॉलिसीमध्ये दोन जण पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. जोपर्यंत प्रायमरी पेन्शन होल्डर हयात आहे तोवर पेन्शन मिळत राहिल. त्यानंतर बेस प्रीमिअमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय ४० वर्षे आणि कमाल वय ८० वर्षे असणे अनिवार्य आहे. हा एक होल लाईफ फॅमिली प्लॅन आहे. पॉलिसी घेतल्यानंतर ६ महिन्यांनी ती सरंडरही करता येते.

प्रीमिअम भरल्यानंतर वार्षिक, तिमाही, सहामाही आधारावर पेन्शन मिळवू शकतो. तसंच पॉलिसी सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर यावर तुम्ही लोनही घेऊ शकता. जर कोणतीही व्यक्ती रिटायर झाली असेल तर रियाटरमेंट दरम्यान मिळालेल्या पैशांनी यात गुंतवणूक करता येईल. जर कोणी यात एकरमकी गुंतवणूकीतू एन्युटी घेतली तर त्याला पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल.

कसंमिळवाल ५० हजारांचं पेन्शन?जर तुम्हाला दर महिन्याला पैसे हवे असतील तर किमान तुम्हाला १००० रुपयांचं पेन्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला १२ हजार रुपये भरावे लागतील. जर तुमचं वय ४० वर्षे आहे आणि तुम्ही १० लाख रूपयांचा सिंगल प्रीमिअम जमा केला तर तुम्हाला वार्षिक ५०२५० रुपये आजीवन मिळतील. याशिवाय तुम्हाला मध्येच तुमचे पैसे परत हवे असतील तर अशा स्थितीत पाच टक्के रक्क कापून तुम्हाला उर्वरित रक्कम परत केली जाईल.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक