Lokmat Money >गुंतवणूक > LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार...

LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार...

एलआयसीकडे भारतीय लष्कर आणि रेल्वे विभागानंतर सर्वाधिक जमीन आणि स्थावर मालमत्ता आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:37 PM2024-06-18T15:37:55+5:302024-06-18T15:38:24+5:30

एलआयसीकडे भारतीय लष्कर आणि रेल्वे विभागानंतर सर्वाधिक जमीन आणि स्थावर मालमत्ता आहेत.

LIC's New Scheme; 58 thousand crore rupees will be obtained by selling land and buildings... | LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार...

LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार...

LIC News : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने सुमारे 58 हजार कोटी रुपयांची योजना बनवली आहे. यासाठी ते त्यांच्या मालकीच्या जमिनी आणि इमारती विकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलआयसी वेगवेगळ्या शहरांमधील त्यांच्या मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. पैसे कमवू शकते. कंपनीचे अनेक भूखंड आणि व्यावसायिक इमारती देखील आहेत. रेल्वे आणि लष्करानंतर LIC कडे सर्वात जास्त जमीन आणि स्थावर मालमत्ता आहे. पण, एलआयसीला त्यांची मालमत्ता का विकायची आहे? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

एलआयसीच्या प्रॉपर्टी प्राइम लोकेशनवर 
LIC ची देशातील अनेक शहरांमध्ये प्रमुख ठिकाणी मालमत्ता आहेत. यात दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील जीवन भारती बिल्डिंगचाही समावेश आहे. याशिवाय, कोलकात्यातील चित्तरंजन अव्हेन्यू येथेही एलआयसीची इमारत आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही त्यांची मालमत्ता आहे. एलआयसीकडील मालमत्तेच्या मूल्यांकनाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांच्याकडे 51 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे. 

कंपनीची काय प्लॅनिंग चालू आहे?
आर्थिक वर्ष 2024 मध्ये LIC चा नफा 40,676 कोटी रुपये होता, तर 2023 मध्ये कंपनीचा नफा 36,397 कोटी रुपये होता. मीडिया रिपोर्टनुसार, एलआयसीने आपली मालमत्ता विकली तर कंपनीच्या नफ्यात वाढ होऊ शकते. मालमत्तेच्या विक्रीनंतर नवीन मालकास इमारतीचा पुनर्विकास आणि वापर करण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते. LIC त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि कमाई करण्यासाठी एक नवीन कंपनी देखील बनवू शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कंपनीच्या काही इमारती अगदी प्राइम लोकेशन्सवर आहेत. त्यांची विक्री करण्यासाठी एलआयसी कायद्यात बदल करावे लागतील.

एलआयसी पहिल्यांदाच अशी योजना आखत नाहीये. एलआयसीने यापूर्वीही आपली मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला होता. कायदेशीर बाबींमुळे संपूर्ण योजना फसली. दुसरीकडे, एलआयसीच्या अनेक इमारती आणि मालमत्ता कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. LIC ला खासगी विमान कंपन्यांकडून तगडे आवाहन मिळत आहे, त्यामुळेच कंपनी ही योजना आखत आहे.

Web Title: LIC's New Scheme; 58 thousand crore rupees will be obtained by selling land and buildings...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.