LIC Policy Scheme: अनेकदा नोकरी करणारे लोक आपले पैसे गुंतवण्याबाबत प्रचंड गोंधळात असतात. चांगले आणि सुरक्षित रिटर्न्स कुठे मिळतील, असे प्रश्न त्यांच्यासमोर असतात. तर, आज आम्ही तुम्हाला LIC च्या 3 योजना सांगणार आहोत, ज्यात पैसे गुंतवूण चांगला परतावा मिळवू शकता. LICची खासियत म्हणजे, यात चांगले रिटर्न्स मिळण्यासोबत, तुमचा पैसा सुरक्षित राहतो.
1. LIC Jeevan Umang PlanLIC ग्राहकांना 'जीवन उमंग पॉलिसी' ऑफर करते. याद्वारे तुम्ही तुमचे म्हतारपण सुरक्षित करू शकता. हा एक एडोमेंट प्लॅन आहे, ज्यात 3 महीन्यांच्या बाळापासून 55 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेची खासियत म्हणजे, तुम्हाला 100 वर्षापर्यंत कव्हरेज मिळतो. तुम्ही 26 वर्षांचे आहात आणि 4.5 लाख रुपयांचे इंश्युरंस कव्हर घेतले, तर या प्लॅनमध्ये 30 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल आणि 31व्या वर्षापासून 36000 रुपये मिळणे सुरू होईल.
2. LIC Tech Term PlanLICकडून ग्राहकांसाठी आणखी एक चांगला प्लॅन दिला जातो. हा प्लॅन आहे 'टेक टर्म प्लॅन.' हा एक रिस्क प्रीमियम प्लॅन आहे, जो तुम्ही 18 वर्षांपासून 65 वर्षापर्यंत खरेदी करू शकता. या प्लॅनच्या कव्हरेजची कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. हा प्लॅन तुम्ही 10 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत खरेदी करू शकता.
3. LIC Jeevan Labh PolicyLICकडून ग्राहकांना 'जीवन लाभ पॉलिसी'देखील दिली जाते. यात किमान 2 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते, तर कमाल गुंतवणूकीची मर्यादा नाही. यात तुम्हाला टॅक्स बेनिफिट आणि डेथ बेनिफिटची सुविधाही मिळते. तुम्ही हा प्लॅन 16 वर्षापासून 25 वर्षापर्यंत घेऊ शकता.