विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीनं (LIC) बुधवारी आपली नवीन स्कीम जीवन उत्सव (LIC Jeevan Utsav) सादर केली. यामध्ये हमी परताव्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, ही 'नॉन-लिंक्ड', नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे.
एलआयसीचा जीवन उत्सव प्लॅन आजीवन गॅरंटीड रिटर्नसह येतो. यामध्ये तुम्हाला पूर्ण लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळेल. यामध्ये प्रीमियम भरण्याचा मर्यादित कालावधी ५ ते १६ वर्षे आहे. प्रीमियम दरम्यान गॅरंटीड वाढीचीही तरतूद आहे. यामध्ये तुम्हाला नियमित उत्पन्नाचा लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्नाचा लाभ मिळेल. किमान मूळ विमा रक्कम ५ लाख रुपये असेल. पॉलिसी सुरू करताना किमान वय १८ आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळी कमाल वय ७५ वर्षे असलं पाहिजे. या योजनेसह, एलआयसी पॉलिसीधारकाला ५.५ टक्के दराने वार्षिक व्याज देखील देईल. दरम्यान, पॉलिसीधारकाला या योजनेसह मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळणार नाही.
पेश है एलआईसी का जीवन उत्सव - आजीवन गारंटीड रिटर्न तथा लाभ चुनने के विकल्प के साथ पूर्ण आयु जीवन बी
— LIC India Forever (@LICIndiaForever) November 29, 2023
*शर्तें लागू#LIC#LICJeevanUtsav#JeevanUtsav#WholeLifePlanpic.twitter.com/77kvgWbtBX
एलआयसीच्या अध्यक्षांनी केलेली घोषणा
एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी गेल्या आठवड्यात नवीन सेवेचे काही फीचर्स सांगितले होते. ही योजना खात्रीशीर परतावा देईल आणि मॅच्युरिटीनंतर पॉलिसीधारकाला आजीवन विम्याच्या रकमेच्या १० टक्के रक्कम मिळेल. नवीन प्रोडक्ट बाजारात येण्यासाठी सज्ज असल्याचे मोहंती म्हणाले होते. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की तो किती पैसे देत आहे आणि त्याला २०-२५ वर्षांनी किती परतावा मिळेल. याशिवाय कर्जाची सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढणे या सुविधांचाही या नव्या सेवेत समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.