विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीनं (LIC) बुधवारी आपली नवीन स्कीम जीवन उत्सव (LIC Jeevan Utsav) सादर केली. यामध्ये हमी परताव्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, ही 'नॉन-लिंक्ड', नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे.
एलआयसीचा जीवन उत्सव प्लॅन आजीवन गॅरंटीड रिटर्नसह येतो. यामध्ये तुम्हाला पूर्ण लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळेल. यामध्ये प्रीमियम भरण्याचा मर्यादित कालावधी ५ ते १६ वर्षे आहे. प्रीमियम दरम्यान गॅरंटीड वाढीचीही तरतूद आहे. यामध्ये तुम्हाला नियमित उत्पन्नाचा लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्नाचा लाभ मिळेल. किमान मूळ विमा रक्कम ५ लाख रुपये असेल. पॉलिसी सुरू करताना किमान वय १८ आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळी कमाल वय ७५ वर्षे असलं पाहिजे. या योजनेसह, एलआयसी पॉलिसीधारकाला ५.५ टक्के दराने वार्षिक व्याज देखील देईल. दरम्यान, पॉलिसीधारकाला या योजनेसह मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळणार नाही.