Join us

₹११ च्या शेअरनं दिला ६०००% रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल; ५ हजार कोटींचा फंड जमवतेय कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:49 PM

Lloyds metals and energy share:  अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

Lloyds metals and energy share:  अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक पेनी शेअर म्हणजे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी (एलएमई). या शेअरनं गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा दिलाय. या काळात शेअरने 11 रुपयांहून 670 रुपयांपर्यंतची पातळी गाठली आहे. 

₹11 होती शेअरची किंमत 

मार्च 2021 मध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या शेअरची किंमत ₹11 होती. हा शेअर सध्या ₹702 वर आहे. गेल्या एका वर्षात, या शेअरनं ₹284.70 च्या पातळीवरून 136 टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात, 12 एप्रिल 2024 रोजी स्टॉकनं ₹710.50 चा विक्रमी उच्चांकी स्तर गाठला होता. या शेअरनं 25 एप्रिल 2023 रोजी ₹277.40 च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून 156 टक्के अधिक परतावा दिलाय. 

2024 मध्ये आजपर्यंत (YTD) हा स्टॉक फक्त 13 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरनं आतापर्यंत वर्षातील 4 पैकी 3 महिन्यांमध्ये सकारात्मक परतावा दिलाय. फेब्रुवारीमध्ये 5.3 टक्के वाढ झाल्यानंतर, एप्रिलमध्ये आतापर्यंत स्टॉक 11 टक्क्यांनी वाढलाय. दरम्यान, जानेवारी 2024 मध्ये त्यात 5.5 टक्क्यांनी घसरण झाली होती. 

कंपनी बद्दल माहिती 

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड भारतात स्पंज आयर्न उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करते. स्पंज आयर्न, पॉवर आणि मायनिंग या तीन श्रेणींमध्ये कंपनी कार्यरत आहे. कंपनी वीज निर्मिती आणि वितरणात गुंतलेली आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची स्थापना 1977 मध्ये झाली आणि ती मुंबई येथे स्थित आहे. 

₹5000 कोटी उभारण्याचा विचार 

गेल्या महिन्यात, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या बोर्डानं क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे (QIP) ₹5000 कोटींपर्यंत रक्कम उभारणीला मंजुरी दिली. लॉयड्स मेटल्स ही रक्कम एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये उभारणार आहे. डिसेंबर तिमाहीपर्यंत लॉयड्स मेटल्सच्या प्रवर्तकांकडे कंपनीत 65.7 टक्के हिस्सा होता. 

कंपनीचे तिमाही निकाल 

कंपनीने डिसेंबर तिमाहीत ₹331 कोटी नफा कमावला, जो डिसेंबर 2022 ला संपलेल्या मागील तिमाहीत ₹230 कोटी पेक्षा 44 टक्क्यांनी अधिक होता. दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ₹1910 कोटींवर गेला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ₹999 कोटींच्या तुलनेत हे प्रमाण 91 टक्क्यांनी अधिक आहे.(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक