लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यासह विविध राज्यांशी स्पर्धा असूनही २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम ठेवले असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीतून समोर आले आहे.
सन २०२३-२४ मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार विकास विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. २०२२-२३ मध्ये ही गुंतवणूक १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये होती.
- एकूण रोजगार निर्मिती - १२३.३९ लाख
- एकूण उद्योग - ३३.०७ लाख
- सूक्ष्म - ३२.०५ लाख
- लघु - ०.९१ लाख
- मध्यम - ०.११ लाख
(उद्योग नोंदणी पोर्टलवर ९ जानेवारी २०२४ पर्यंतच्या नोंदणीनुसार)
स्टार्टअप्समध्ये राज्याचा वाटा सर्वाधिक मार्च २०२४पर्यंत अखिल भारतीय स्तरावर केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा १९ टक्के इतका आहे.२०२२-२३ मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये राज्यातून होणाऱ्या निर्यातीचा वाटा १६ टक्के इतका होता.
- डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यात २२,९३७ प्रकल्पांना मान्यता
- ऑगस्ट १९९१ मध्ये उदारीकरण धोरण स्वीकारल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यात
- १८ लाख ३८ हजार ४४५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सर्व २२ हजार ९३७ औद्योगिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.