Join us

पुढच्या वर्षी बंद होणार 'ही' स्कीम, महिलांना मिळतंय मोठं व्याज; ₹१,००,००० जमा केल्यास किती रक्कम मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 1:13 PM

Post Office Scheme MSSC: भारत सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही स्कीम पुढील वर्षापर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे आता गुंतवणूकीसाठी कमी कालावधी शिल्लक आहे.

Post Office Scheme MSSC: भारत सरकारमहिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate-MSSC). अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. दोन वर्षांची मुदत असलेल्या या डिपॉझिट स्कीमवर ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ताबडतोब करा कारण तुमच्याकडे यात गुंतवणूक करण्यासाठी कमी वेळ शिल्लक आहे. ही योजना सध्या मार्च २०२५ पर्यंतच उपलब्ध असेल.

कसं उघडाल खातं?

जर तुम्हालाही महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडू शकता. अल्पवयीन मुलीच्या नावानं पालक खातं उघडू शकता. खातं उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल.

वर्षभरानंतर अंशत: पैसे काढण्याची सुविधा

नियमाप्रमाणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना २ वर्षात मॅच्युअर होते, परंतु त्यात १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अंशत: पैसे काढण्याची सुविधा मिळते. गरज पडल्यास एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढू शकता. जर तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.

किती रकमेवर किती रिटर्न?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कॅल्क्युलेटरनुसार, जर महिलांनी या योजनेत ५०,००० रुपये गुंतवले तर त्यांना दोन वर्षांत व्याज म्हणून ८०११ रुपये मिळतील आणि अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण ५८,०११ रुपये मिळतील. जर तुम्ही १,००,००० रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी १,१६,०२२ रुपये मिळतील.

जर तुम्ही या योजनेत १,५०,००० रुपये जमा केले तर दोन वर्षांनंतर तुम्हाला १,७४,०३३ रुपये म्हणजेच २४,०३३ रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील आणि जर २,००,००० रुपये या योजनेत गुंतवले तर दोन वर्षांनंतर ७.५ टक्के व्याजदरानं गुंतवलेल्या रकमेवर व्याज म्हणून ३२,०४४ रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील.

टॅग्स :गुंतवणूकसरकारमहिला