केंद्र सरकारनं महिलांसाठी काही विशेष स्कीम सुरू केल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची (Mahila Samman Savings Certificate -MSSC) घोषणा करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२३ मध्ये ही स्कीम लाँच करण्यात आली. या योजनेअंतर्गत कोणत्याही महिलेला या स्कीममध्ये खातं सुरू करता येणार आहे. या योजनेवर सध्या ७.५ टक्के वार्षिक व्याज दिलं जातंय. हे व्याज तिमाही आधारावर खात्यात जमा केलं जाईल. कोणताही खातेदारक वार्षिक १००० रुपयांपासून या स्कीममध्ये रक्कम जमा करू शकतो. महिला सन्मान बचत पत्र योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजेच २ वर्षांसाठी उपलब्ध आहे.केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि यात भाग घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील बँकांना MSSC ची खाती उघडण्याचे अधिकार दिले आहेत. याशिवाय ही सुविधा देशभरातील पोस्ट ऑफिसेसमध्येही सुरु करण्यात आलीये. ज्या महिलांना या स्कीममध्ये खातं सुरू करायचं असेल त्या पोस्ट खात्यात जाऊनही खातं उघडू शकतात. काय आहे खास?महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या स्कीमची सुरूवात करण्यात आलीये. १ एप्रिलपासून ही स्कीम सुरू करण्यात आली. या स्कीमचा लाभ घेण्यासाठई महिलांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो आवश्यक आहे. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर यात गॅरंडीज इन्कम मिळतं. या स्कीममध्ये पैसे दोन वर्षांसाठी जमा केले जाऊ शकतात. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला या स्कीमच्या २ वर्षांच्या व्याजाचा लाभ देण्यात येतो.
२ लाखांवर किती परतावाजर तुम्ही या स्कीममध्ये २ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर पहिल्या तिमाहीनंतर यात ३,७५० रुपयांचं व्याज मिळेल. दुसऱ्या तिमाहीच्या अखेरिस यात पुन्हा गुंतवणूक केल्यास ३८२० रुपयांचं व्याज मिळेल. या हिशोबानं या स्कीमच्या मॅच्युरिटीवर २,३२,०४४ रुपयांची एकूण रक्कम मिळेल.