Join us

एक नाही, सोन्यात गुंतवणूकीचे आहेत अनेक फायदे; पाहा तुमच्या पोर्टफोलिओत का सामील केलं पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:40 IST

गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोनं हा एक चांगला पर्याय आहे. पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करावा, असे बहुतांश तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया सोन्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत.

Gold Investment: भारतात सोन्याची क्रेझ कोणापासून लपून राहिलेली नाही. सोनं महाग असो वा स्वस्त, त्याच्या खरेदीत फरक पडत नाही. लग्नापासून साखरपुड्यापर्यंत, तसंच अनेकदा सणांच्या पार्श्वभूमीवरही लोक सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी वगैरे खरेदी करतात. पण दुसरीकडे पाहिलं तर गुंतवणुकीच्या दृष्टीनंही हा एक चांगला पर्याय आहे. पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करावा, असे बहुतांश तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया सोन्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत.

दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक

प्रत्येक देशाचं चलन त्या देशापुरतं मर्यादित असतं, परंतु सोन्याबाबत तसं होत नाही. सोन्याला नेहमीच मागणी असते. त्याच्यासाठी खरेदीदार नेहमीच असतात. म्हणजेच रोख रकमेनंतर सोनं ही सर्वात लिक्विड गुंतवणूक आहे. सोनं केव्हाही विकलं जाऊ शकतं आणि बाजारभावाइतके पैसे मिळू शकतात. सोने ही दीर्घ काळासाठी सुरक्षित गुंतवणूक आहे.

हेदेखील आहेत फायदे

  • महागाईबरोबरच सोन्याचे दरही वाढतात.
  • सोनं ही कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते.
  • कठीण काळात तुम्ही सोनं गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता आणि पैशांची गरज भागवू शकता.
  • आर्थिक अनिश्चितता आणि महागाईच्या काळातही सोन्याचे दर स्थिर असतात.
  • सोनं कुठेही सहज वाहून नेलं जाऊ शकतं.
  • सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता.

फिजिकल सोनं विकत घेण्याची गरज नाही

पूर्वीच्या काळी सोने केवळ भौतिक स्वरूपात खरेदी केलं जात होतं, परंतु आज सोन्यात गुंतवणुकीच्या दृष्टीनं इतर पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोनं खरेदी करत असाल तर तुम्ही गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता. गोल्ड ईटीएफ शेअर म्हणून खरेदी करून डिमॅट खात्यात ठेवता येतात. त्याचबरोबर डिजिटल सोनं आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवलं जातं. या प्रकारच्या सोन्यात सुरक्षिततेची चिंता नाही आणि शुल्क वगैरेची चिंताही नसते. याशिवाय हे सोनं तुम्ही छोट्या बचतीतूनही खरेदी करू शकता आणि आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवू शकता.

टॅग्स :सोनंगुंतवणूक