Join us  

टमाट्याच्या वाढत्या किमतीमुळे 'मॅकडॉनल्ड्स'ला फटका; आउटलेट्समधून टमाटे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 7:44 PM

सध्या अनेक ठिकाणी टमाट्याचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून टमाट्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्यांसोबत हॉटेल उद्योगालाही याचा फटका बसला आहे. याच कारणामुळे लोकप्रिय फूड चेन 'मॅकडॉनल्ड्स'ने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, मॅकडॉनल्ड्सने आपल्या बहुतांशी आउटलेटमध्ये टमट्याचे फूड आयटम्स देणे बंद केले आहे. 

रिपोर्टनुसार, कंपनीने उत्तर आणि पूर्व भारतासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात टमाट्याच्या किमती 200 रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत. काही ठिकाणी 150 तर काही ठिकाणी 250 रुपयांवर रेट गेला आहे. परंतू, या निर्णयामागे कंपनीने किंमत नाही, तर टमाट्याच्या गुणवत्तेचे कारण पुढे केले आहे. मॅकडॉनल्ड्स इंडिया (उत्तर आणि पूर्व) ने सांगितले की, 'काही भागांमध्ये चांगल्या क्वालिटीचे टमाटे मिळत नाहीये. आम्ही आमच्या ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे अन्न पदार्थ देण्यास बांधील आहोत, त्यामुळे सध्या टमाट्याचे फूड आयटम्स देणे बंद करत आहोत.'

या निर्णयानंतर सोशल मीडिया युजर्स मेकडॉनल्ड्सची फिरकी घेत आहेत. अनेकांचे म्हणने आहे की, टमाट्याचे भाव वाढवल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. काहीजण मॅकडॉनल्ड्स आउटलेट्सवर लागलेली कंपनीची नोटिसही ऑनलाईन शेअर करत आहेत. कारण काहीही असो, मेकडॉनल्ड्सचे फूड आयटम्स खाणाऱ्यांना काही दिवस टमाट्याचे प्रोडक्ट्स मिळणार नाहीत, हे मात्र पक्के झाले आहे.

टॅग्स :व्यवसायसोशल मीडियाजरा हटके