Join us  

Modi Govt’s Pension Scheme: दररोज जमा करा दोन रुपये, मिळेल ३६ हजारांचं पेन्शन; पाहा कसा घेऊ शकता फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 1:38 PM

जीवनातील इतिकर्तव्यांची पूर्तता केली की निवृत्तीची ओढ लागते. मात्र, निवृत्तीनंतरही जगण्यासाठी पैसा लागतोच. तर पाहा काय आहे ही सरकारी योजना.

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan: जीवनातील इतिकर्तव्यांची पूर्तता केली की निवृत्तीची ओढ लागते. मात्र, निवृत्तीनंतरही जगण्यासाठी पैसा लागतोच. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने पैशांची तजवीज करून ठेवत असतो. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मात्र तसे नसते. त्यांचे पोट हातावर असते. अशांना धीर देणारी योजना केंद्राने काही वर्षांपूर्वी आणली. तिची लोकप्रियता वाढू लागली आहे.

केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची हमी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये जमा करून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल...

दरमहा 55 रुपये जमा करावे लागतीलही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी.  या योजनेत तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी दररोज जवळपास 2 रुपये जमा केल्यास तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. 

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.

या डॉक्युमेंट्सची गरजया योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

असे करावे लागेल रजिस्ट्रेशनया योजनेसाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये कामगार पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

द्यावी लागेल ही माहितीरजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असणार आहे. याशिवाय, संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत देखील द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.

टॅग्स :निवृत्ती वेतनसरकार