Lokmat Money >गुंतवणूक > बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील

बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील

Money saving tips : या दिवाळीत तुम्ही नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टीप्स सांगणार आहोत. या वापरुन तुमचे हजारो रुपये नक्की वाचतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:56 AM2024-10-18T11:56:56+5:302024-10-18T11:59:28+5:30

Money saving tips : या दिवाळीत तुम्ही नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टीप्स सांगणार आहोत. या वापरुन तुमचे हजारो रुपये नक्की वाचतील.

money saving tips on buying new motorcycle | बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील

बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील

Motorcycle Buying Guide : दिवाळीत प्रत्येकजण खरेदीचा आनंद लुटत असतो. अनेक कंपन्याही या काळात आपल्या वस्तूंवर बंपर ऑफर्स देत असतात. जर तुम्ही या सणाला नवीन मोटारसायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण, चांगल्या ऑफरची किंवा सवलतीची वाट पाहत असाल, तर प्रतीक्षा करू नका. आम्ही तुम्हाला अशा टीप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही ५ ते १० हजारांची बचत सहज करू शकता.

वाहन विमा स्वतः खरेदी करा (Bike Insurance)
तुम्ही जेव्हा नवीन गाडी खरेदीसाठी शोरूममध्ये जाता. त्यावेळी डीलर मोटारसायकलसोबत विमा पॉलिसी घेण्याची ऑफर देतात. मात्र, याची किमत वास्तविक मूल्यापेक्षा जास्त असते. बहुतेक ग्राहक डीलरकडूनच विमा उतरवतात. जर तुम्ही नवीन बाईक घेत असाल तर डीलरशिपने दिलेल्या विमा पॉलिसीऐवजी स्वतः खरेदी करा. यामध्ये जवळपास तुमचे अडीच ते ३ हजार रुपये नक्की वाचतील. आता जवळपास सर्व कंपन्या ऑनलाईन इन्शुरन्स विकतात.

योग्य मॉडेल निवडा (Bike Model)
बाईकच्या बेसिक आणि टॉप मॉडेल्समध्ये फारसा फरक नसला तरी त्यांच्या किमतीत खूप फरक असतो. त्यामुळे कोणतीही बाईक विकत घेण्यापूर्वी त्याच्या बेस मॉडेल आणि टॉप मॉडेलमध्ये उपलब्ध फीचर्स नक्की पहा आणि त्यानंतरच व्हेरियंट निवडा. असे केल्याने तुमचे काही हजार रुपये नक्कीच वाचतील.

गरजेनुसार बाईक खरेदी करा
मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी तुमच्या गरजा आणि बजेटचा नीट विचार करा. त्यानंतरच कोणतीही बाईक घेण्याचा निर्णय घ्या. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ऑफिससाठी बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही स्पोर्ट्स किंवा क्रूझर बाईक ऐवजी कमी बजेटमध्ये मायलेज देणारी बाईक घ्या. अशा बाईकचा देखभाल खर्चही खूप कमी असतो. जर तुम्ही तुमच्या गरजा लक्षात घेऊन बाईक खरेदी केली तर तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकाल.

बाईक कंपनी आणि सपोर्ट कसा आहे? (Customer Support)
सध्या इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा ट्रेंड सुरू आहे. मात्र, अनेक कंपन्यांची ग्राहक सेवा वाईट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवीन बाईक खरेदी करताना कंपनीची ग्राहक सेवा कशी आहे? याचा नक्कीच विचार करा. अनेक कंपन्या १ वर्षापर्यंत सर्विस फ्री देतात. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो.

बाईकसाठी ॲक्सेसरीज (Bike accessories)
बाइक खरेदी करताना डीलरशिप ग्राहकांना बाइकसाठी ॲक्सेसरीज ऑफर करतात. ज्याची किंमत खूप जास्त असते. जर तुम्हाला बाईकसाठी ॲक्सेसरीज बसवायची असतील, तर डीलरशीपकडून विकत घेण्याऐवजी मार्केटमधून खरेदी करणे चांगले. तुम्ही बाहेरून ॲक्सेसरीज खरेदी करून खूप बचत कराल याची खात्री आहे.

Web Title: money saving tips on buying new motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.