Lokmat Money >गुंतवणूक > पोस्ट खात्यातील MIS योजना सर्वात लोकप्रिय; बँकेपेक्षा अधिक व्याजदराचा लाभ

पोस्ट खात्यातील MIS योजना सर्वात लोकप्रिय; बँकेपेक्षा अधिक व्याजदराचा लाभ

पोस्ट खात्यातील एमआयएस (मंथली इन्कम स्कीम) ही योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 11:57 AM2023-05-11T11:57:47+5:302023-05-11T11:58:25+5:30

पोस्ट खात्यातील एमआयएस (मंथली इन्कम स्कीम) ही योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे. 

Most Popular MIS Scheme in Post Account; Banks get interest rate for account holder | पोस्ट खात्यातील MIS योजना सर्वात लोकप्रिय; बँकेपेक्षा अधिक व्याजदराचा लाभ

पोस्ट खात्यातील MIS योजना सर्वात लोकप्रिय; बँकेपेक्षा अधिक व्याजदराचा लाभ

नवी दिल्ली - सर्वसामान्य माणूस कमावलेल्या पैशातून बचतीसाठी नेहमीच पर्यायी मार्ग शोधत असतो. मुदत ठेव बचत योजनांची माहिती घेत, बँकांमध्ये आपली रक्कम जमा करुन अधिक व्याज मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच, वेगेवगळ्या बँकांकडून मुदत ठेव योजनांवर ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याजदर देण्यात येते. तर, केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याकडूनही गुंतवणूकदारांना लाभ मिळवून देणाऱ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, दरमहा कमाईची गॅरंटी देणाऱ्याही योजना देण्यात येतात. त्याला, पेन्शन योजना म्हणूनही पाहिलं जातं. पोस्ट खात्यातील एमआयएस (मंथली इन्कम स्कीम) ही योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे. 

एमआयएस या योजनेत ग्राहकांना काय लाभ मिळतो, त्यांना किती व्याजदराने पैसे मिळतात, याची माहिती आपण घेऊयात. 

पोस्ट खात्यातील मंथली इन्कम स्कीम मध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात, तर व्याजदरही चांगले मिळते. 

पोस्ट खात्याच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एमआयएस योजनेवर ७.४ टक्के व्याजदराने रिटर्न्स मिळतात. 

पोस्टात खाते उघडल्यानंतर १ महिन्यांनी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. त्यानुसार, दहमहा तुम्हाला व्याजदराची रक्कम मिळते.

१००० रुपयांत उघडता येईल खाते

एमआयएस खात्यांतर्गत पोस्टात कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करुन खाते उघडता येते. सिंगल आणि जॉईंट अशा दोन पद्धतीने तुम्हाला हे खाते खोलता येते. 

सिंगल अकाऊंटमध्ये तुम्ही अधिकाधिक ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तर, जॉईंट अकाऊंटमध्ये तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. 

पोस्ट खात्यातील या योजनेसाठी लॉकड पिरियड ५ वर्षांचा आहे, त्यानंतर ५ वर्षांनी तुम्हाला अकाऊंट क्लोज करता येते किंवा पुढेही सुरू ठेवता येते. 
 

Web Title: Most Popular MIS Scheme in Post Account; Banks get interest rate for account holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.