Join us  

सुनबाईचा पायगुण; मुकेश अंबानींच्या संपत्तीत जोरदार वाढ, 10 दिवसांत 25000 कोटींची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 3:42 PM

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर पोहोचले आहेत.

Mukesh Ambani Net Worth : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकले. जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असलेल्या अनंत-राधिकाच्या लग्नात देशासह जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक दिग्गज  नेतेही उपस्थित होते. दरम्यान, आता नवीन सुनबाईच्या पायगुणामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. पण, या कालावधीत त्यांच्या संपत्तीमध्ये कोणताही बदल झाला नसून, त्यात मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. 

श्रीमंतांच्या यादीत स्थान वाढले एकूण संपत्ती वाढल्यानंतर मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत एक स्थान वर आले आहेत. अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, 5 जुलै रोजी त्यांची एकूण संपत्ती $118 अब्ज होती, जी आता $121 अब्ज झाली आहे.

अवघ्या 10 दिवसात 25000 कोटींची कमाईयाचा अर्थ गेल्या 10 दिवसांत त्यांची संपत्ती 3 अब्ज डॉलर्सने (सुमारे 25000 कोटी रुपये) वाढली आहे. सोमवारच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, मुकेश अंबानी यांनी गेल्या 24 तासांत 109 मिलियन डॉलर्स (सुमारे 9010 कोटी रुपये) कमावले आहेत. 

रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ12 जुलैला लग्नाच्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले होते. शेअर्सच्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली. गेल्या एका महिन्यात शेअर्स 6.65% वाढले आहेत. तसेच, या शेअर्सनी सहा महिन्यांत 14.90% पर्यंत परतावा दिला आहे. 

(टीप- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या.)

 

टॅग्स :मुकेश अंबानीअनंत अंबानीव्यवसायगुंतवणूकशेअर बाजार