Lokmat Money >गुंतवणूक > धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची मोठी भेट; फक्त 10 रुपयांत खरेदी करा सोने

धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची मोठी भेट; फक्त 10 रुपयांत खरेदी करा सोने

Buy Gold on This Dhanteras : धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांच्या कंपनीने जबरदस्त ऑफर आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:02 PM2024-10-29T15:02:42+5:302024-10-29T15:03:29+5:30

Buy Gold on This Dhanteras : धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांच्या कंपनीने जबरदस्त ऑफर आणली आहे.

Mukesh Ambani's big gift on Dhanateras; Buy gold for just 10 rupees | धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची मोठी भेट; फक्त 10 रुपयांत खरेदी करा सोने

धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची मोठी भेट; फक्त 10 रुपयांत खरेदी करा सोने

Buy Gold on This Dhanteras : वर्षातील सर्वात मोठ्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधून तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांची कंपनी जबरदस्त ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त 10 रुपयांना सोने खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्हाला घरबसल्या सोने मिळेल.

स्मार्टगोल्डसह धनत्रयोदशी साजरी करा
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेडने त्यांची नवीन योजना “स्मार्टगोल्ड” लॉन्च केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करू शकता. यामध्ये तुमचे सोने एकदम सुरक्षित राहील. स्मार्टगोल्ड योजनेंतर्गत ग्राहक त्यांची सोन्यामधील गुंतवणूक कधीही रोख, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांमध्ये रुपांतरित करू शकतात.

फक्त 10 रुपयांत गुंतवणूक
या योजनेची खास गोष्ट म्हणजे, यासाठी तुम्हाला हजारो किंवा लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 10 रुपयांत किंवा तुमच्या इच्छेनुसार सोने खरेदी करू शकता.

अशी करा गुंतवणूक 
मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स ॲपद्वारे तुम्ही स्मार्टगोल्ड योजनेत दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. ग्राहक एकूण गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकतात किंवा सोन्याच्या वजनानुसार सोने खरेदी करू शकतात. भौतिक सोन्याची डिलिव्हरी फक्त 0.5 ग्रॅम किंवा त्याहून अधिक होल्डिंग्सपुरती मर्यादित असेल. तसेच, तुम्ही थेट सोन्याची नाणी खरेदी करण्याची सुविधा देखील घेऊ शकता, यासाठी तुम्हाला होम डिलिव्हरी देखील मिळेल.

चोरीची भीती नाही
स्मार्टगोल्ड योजनेअंतर्गत ग्राहक 24 कॅरेट सोनेदेखील खरेदी करू शकतात. ते सुरक्षित विमा केलेल्या तिजोरीत ठेवले जाईल. यामुळे सोने तर सुरक्षित राहीलच, पण चोरीची भीतीही राहणार नाही. ॲपच्या मदतीने तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही सोन्याची थेट किंमत पाहू शकता.

Web Title: Mukesh Ambani's big gift on Dhanateras; Buy gold for just 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.