Mukesh Ambani:रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी मोठी खरेदी केली आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ब्रिटीश कंपनीचे संपूर्ण स्टेक खरेदी केले आहेत. 2021 मध्ये झालेल्या या डीलमध्ये आता त्यांनी कंपनीचे उर्वरित स्टेकही विकत घेतले. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या पॅराडियन लिमिटेड, या ब्रिटिश कंपनीचा उर्वरित 8 टक्के भागभांडवलही खरेदी करण्यात आला आहे.
ब्रिटीश कंपनी फॅरेडियन सोडियन आयन बॅटरी तंत्रज्ञानावर काम करते. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड जामनगरमधील धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी स्टोरेज गिगाफॅक्टरीमध्ये फॅराडियनचे प्रगत तंत्रज्ञान वापरणार आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जीने ब्रिटीश कंपनी फॅरेडियनचा संपूर्ण हिस्सा खरेदी केला आहे. 2021 मध्ये झालेल्या या करारातील उर्वरित 8 टक्के हिस्सादेखील आता रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडचा असेल.
सौदा कितीत झाला?रिलायन्सने फॅराडियनचा उर्वरित 8 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. डिसेंबर 2021 मध्ये रिलायन्सने फॅराडियनशी 100 मिलियन युरोचा करार केला होता. तसेच, कंपनीने या कंपनीमध्ये डेव्हलपमेंट कॅपिटल म्हणून 25 मिलियन युरोची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांनी परदेशी कंपन्यांशी करार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी रिलायन्सने एआय चिप उत्पादक कंपनी Nvidia सोबत करार केला आहे.