Lokmat Money >गुंतवणूक > Mukesh Ambani यांचा साम्राज्‍य विस्तार, आता 'ही' कंपनी विकत घेतली; एवढ्या कोटींमध्ये करार...

Mukesh Ambani यांचा साम्राज्‍य विस्तार, आता 'ही' कंपनी विकत घेतली; एवढ्या कोटींमध्ये करार...

Mukesh Ambani Reliance Retail : यापूर्वी रिलायन्स समुहाने कॅम्पा कोलाची मालकी मिळवली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 02:54 PM2023-03-15T14:54:29+5:302023-03-15T14:56:25+5:30

Mukesh Ambani Reliance Retail : यापूर्वी रिलायन्स समुहाने कॅम्पा कोलाची मालकी मिळवली होती.

Mukesh Ambani's empire expansion, now acquired 'Metro Cash & Carry India' company | Mukesh Ambani यांचा साम्राज्‍य विस्तार, आता 'ही' कंपनी विकत घेतली; एवढ्या कोटींमध्ये करार...

Mukesh Ambani यांचा साम्राज्‍य विस्तार, आता 'ही' कंपनी विकत घेतली; एवढ्या कोटींमध्ये करार...

Mukesh Ambani Metro Cash & Carry : गेल्या काही वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा व्यवसाय झपाट्याने विस्तारत आहे. रिलायन्सने यापूर्वी कॅम्पा कोलाची मालकी मिळवली होती. त्यानंतर आता समूहाने आणखी एका कंपनीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) जर्मनीची कंपनी मेट्रो एजी (Metro AG) च्या देशातील व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. 

2,850 कोटी रुपयांचा करार
Reliance Retail Ventures Limited (RRVL) ही Reliance Industries Limited (RIL) ची उपकंपनी आहे, तर Metro AG ची Metro Cash & Carry India भारतात व्यवसाय करते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये RRVL ने कंपनीतील 100 टक्के स्टेकसाठी 2,850 कोटी रुपयांच्या कराराची घोषणा केली होती. नियामकाने ट्विट करुन माहिती दिली की, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) द्वारे मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणास मान्यता देण्यात आली आहे.

मेट्रोबद्दल अधिक जाणून घ्या
मेट्रो इंडियाने 2003 मध्ये देशात आपला व्यवसाय सुरू केला. कॅश अँड कॅरी बिझनेस फॉरमॅट सादर करणारी मेट्रो एजी ही देशातील पहिली कंपनी होती. कंपनीचे 21 शहरांमध्ये 31 मोठे स्टोअर्स आहेत, ज्यांची मालकी आता रिलायन्सकडे आहे. या शहरांमधील कंपनीच्या स्टोअरमध्ये 3500 हून अधिक कर्मचारी काम करतात. या अधिग्रहणानंतर रिलायन्स रिटेलला थेट फायदा होईल.

Web Title: Mukesh Ambani's empire expansion, now acquired 'Metro Cash & Carry India' company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.