housing sales : कोरोनानंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आली आहे. गेल्या काही वर्षातील घरांच्या विक्रीची आकडेवारी पाहिलं तर हे स्पष्ट होतं. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशातील ८ मोठ्या शहरांमधील घरांची विक्री वार्षिक ५ टक्क्यांनी वाढून ८७ हजार १०८ युनिट्सवर गेली आहे. रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक इंडियाने गुरुवारी आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. वास्तविक, काही शहरामध्ये यात घटही पाहायला मिळाली आहे. मुंबई आणि पुणे शहरात लोकांना घरखरेदीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.
वर्षाच्या अखेरीस बाजारात उत्साहबातम्यांनुसार, २०२४ मध्ये निवासी बाजारपेठेत चांगली वाढ झाली आहे. या तिमाहीत या वर्षातील सर्वाधिक तिमाही विक्रीची नोंद झाली आहे. नाइट फ्रँक इंडियाचे सीएमडी शिशिर बैजल म्हणाले की, घरांच्या विक्रीत वाढ ही प्रीमियम घरांमुळे झाली आहे. हे प्लॅट १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे होते. बजेट घरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आकडा चिंतेचा विषय आहे. उपलब्धता आणि बजेट घर या आव्हानांमुळे या श्रेणीतील विक्रीत घट झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत सर्वाधिक विक्रीअहवालानुसार, दिल्ली-एनसीआर वगळता सर्व प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. येथे वर्षभरात ७ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. मुंबईत सर्वाधिक २४ हजार २२२ युनिट्सची विक्री झाली. हा बाजारासाठी नवा उच्चांक आहे. मुंबईतील विक्रीत वार्षिक ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये, बेंगळुरूमध्ये विक्रीत सर्वात मोठी झेप दिसली. येथे १४ हजार ६०४ फ्लॅट्स विकले गेले. ही वाढ ११ टक्क्यांची आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील घरांची विक्री १ टक्क्यांनी वाढून १३ हजार २०० युनिट्सवर पोहोचली. तर हैदराबादमध्ये मागणी ९ टक्क्यांनी वाढून ९ हजार ११४ युनिट्सवर पोहोचली.
२ बीएचके घरांना मागणीगेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहिली तर लहान घरविक्रीत घट पाहायला मिळत आहे. लोक आता १ बीएचकेपेक्षा २ बीएचके घरांना पसंती देत आहे. तर दुसरीकडे व्यावसायिकही मोठी घरं बांधण्याला प्राधान्य देत आहे. यात बिल्डरांचा जास्त फायदा होत असल्याचे दिसत आहे. बरेच विकासक १ बीएचकेच्या एरियात २ बीएकचे बसवत आहे. परिणामी घरांची किंमत आणखी वाढते. ग्राहकाला एरिया तेव्हढाच मिळतो, फक्त म्हणायला २ बीएचके असतो.