Lokmat Money >गुंतवणूक > म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

शेअर बाजारासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदेखील चांगला परतावा देते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 02:45 PM2024-11-13T14:45:53+5:302024-11-13T14:46:20+5:30

शेअर बाजारासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदेखील चांगला परतावा देते.

mutual fund or money printing machine; ₹ 10 lakh becomes ₹ 7.26 crore | म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

Mutual Fund Investment : तुमच्यापैकी अनेकजण शेअर बाजारातून चांगली कमाई करत असतील. पण, फार कमी लोकांना माहितीये की, फक्त शेअर बाजारच नाही, तर म्युच्युअल फंडदेखील गुंतवणूकदारांना करोडपती बनवू शकतो. तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनेक पटीने परतावा मिळू शकतो. आम्ही एका अशा फंडबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या फंडाने 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त केले आहे. 

या फंडाने केले करोडपती 
ICICI प्रुडेंशियल मल्टी ॲसेट फंड, देशातील सर्वात मोठ्या मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडांपैकी एक असून, याने गुंतवणूकदारांना करोडपती बनवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. आकडेवारीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 वर्षांपूर्वी ICICI प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट फंडमध्ये 10 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे मूल्य 7.26 कोटी रुपये झाले आहे. आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबर 2002 रोजी ICICI प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट फंडमध्ये केलेल्या 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वार्षिक 21.58 टक्के चक्रवाढ दराने परतावा मिळाला आहे. 

एसआयपीचा इतका फायदा
जर आपण SIP बद्दल बोललो, तर यातदेखील या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. जर गुंतवणूकदाराने या फंडात दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवले असते, तर 22 वर्षांत त्याचे मूल्य 2.9 कोटी रुपये झाले असते. प्रत्यक्ष गुंतवणूक फक्त 26.4 लाख रुपये आहे. याचा अर्थ फंडाने गुंतवणूकदारांना 18.37 टक्के CAGR वर परतावा दिला आहे. योजनेच्या बेंचमार्कमध्ये, याच गुंतवणुकीने 14.68 टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. 

तज्ञ काय म्हणतात?
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे एमडी आणि सीईओ निमेश शाह म्हणतात की, फंडाचा संपत्ती निर्मितीचा प्रवास विविध मालमत्ता वर्गांमध्ये शिस्तबद्ध मालमत्ता वाटपाच्या सामर्थ्याचा एक मजबूत पुरावा आहे. या दृष्टिकोनामुळे आमच्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन लाभदायक गुंतवणुकीचे परिणाम लाभले आहेत. 

(टीप- शेअर बाजार किंवा म्युच्युअ फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: mutual fund or money printing machine; ₹ 10 lakh becomes ₹ 7.26 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.