Lokmat Money >गुंतवणूक > Mutual Fund: म्युच्युअल फंडात SIP द्वारे रेकॉर्ड गुंतवणूक, वाढतोय गुंतवणूकदारांचा भरवसा; पाहा डिटेल्स

Mutual Fund: म्युच्युअल फंडात SIP द्वारे रेकॉर्ड गुंतवणूक, वाढतोय गुंतवणूकदारांचा भरवसा; पाहा डिटेल्स

म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 02:26 PM2023-06-10T14:26:59+5:302023-06-10T14:27:32+5:30

म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास वाढला आहे.

Mutual Fund Record investment through SIP in mutual funds increasing investor confidence See details more profit | Mutual Fund: म्युच्युअल फंडात SIP द्वारे रेकॉर्ड गुंतवणूक, वाढतोय गुंतवणूकदारांचा भरवसा; पाहा डिटेल्स

Mutual Fund: म्युच्युअल फंडात SIP द्वारे रेकॉर्ड गुंतवणूक, वाढतोय गुंतवणूकदारांचा भरवसा; पाहा डिटेल्स

शेअर बाजारात होत असलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसूलीमुळे इक्विटी म्युच्युअल फंडात सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणूक कमी झाली आहे. मे महिन्यात या गुंतवणूकीत तब्बल ५० टक्क्यांची घट झाली असून ती ३२४० कोटी रुपयांवर आली आहे. एप्रिल महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात ६४८० कोटी रुपयांची गुंतवणूक आली.

म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानं (AMFI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर २०२२ नंतरची ही सर्वात निचांकी पातळी आहे. तज्ञांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंडातील कमी गुंतवणुकीचे आणखी एक कारण म्हणजे स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप श्रेणीतील फंडांची गुंतवणूक. दरम्यान, म्युच्युअल फंड उद्योगाच्या असेट्स अंडर मॅनेजमेंटचा आकार एप्रिलच्या अखेरीस ४१.६२ लाख कोटी रुपयांवरून मे अखेरीस ४३.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

एसआयपी विक्रमी पातळीवर
मे महिन्यात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संख्येत ७.४४ टक्क्यांनी वाढ झाली. याद्वारे येणारी रक्कम १४,७४९ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली आहे. तर एप्रिलमध्ये १३,७२८ कोटी रुपये आले. डेट फंडांमध्ये ४५,९५९ कोटींता इनफ्लो दिसला, जे एप्रिलच्या १.०६ लाख कोटीपेक्षा फार कमी आहे. डेट सेगमेंटमध्ये, शॉर्ट टर्म लिक्विड फंडांनी ४५,२३४ कोटींचा नेट इनफ्लो पाहिला, तर ओव्हरनाईट फंडमध्ये १८,९१० कोटींचा आऊट फ्लो दिसून आला.

Web Title: Mutual Fund Record investment through SIP in mutual funds increasing investor confidence See details more profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.