Mutual Fund SIP: भारतात SPI द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये एसआयपी इन्फ्लोने 16,420 कोटी रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. ऑगस्टमध्ये हा 15,814 कोटी रुपयांवर होता. सप्टेंबरमध्ये SIP खात्यांची संख्याही 7.12 कोटींवर पोहोचली. ऑगस्ट 2023 मध्ये हा आकडा 6.9 कोटी होता. सप्टेंबरमध्ये अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) मध्येही मोठी वाढ दिसून आली आणि हे 8.72 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तर, ऑगस्ट 2023 मध्ये एकूण AUM 8.47 लाख कोटी रुपये होते.
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये मासिक आधारावर सर्वात मोठी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ईटीएफमध्ये 1863 कोटी रुपये गुंतवले गेले होते, तर सप्टेंबरमध्ये हा आकडा 3,243 कोटी रुपयांवर पोहचला. लाभांश आणि ईएलएसएस फंडांचे योगदान देखील अनुक्रमे 255 कोटी आणि 141 कोटी रुपये झाला. परंतु ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट बाँड फंडांमध्ये 2,460 कोटी रुपयांची घट झाली आहे.
रिपोर्टनुसार, इक्विटी म्यूचुअल फंडात सप्टेंबरमध्ये सलग 31व्या महिन्यात नेट इन्फ्लो चालू राहिला. परंतू, ऑगस्टमध्ये यात किरकोळ घसरण दिसून आली. पण, गुंतवणूक 13,857 कोटींवर स्थिर राहिली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप, दोन्ही फंडात चांगला इन्फ्लो होता. लार्जकॅपने आउटफ्लो नोंदवला. सप्टेंबर महिन्यात स्मॉलकॅप फंड्सला 2,678 कोटी रुपये मिळाले, जे एका महिन्यापूर्वीच्या 4,265 कोटींपेक्षा कमी आहे. मिडकॅप फंडातील गुंतवणूक 2,512 कोटी रुपयांनी घसरुन 2,001 कोटींवर आली.