Lokmat Money >गुंतवणूक > NPS Scheme: दररोज फक्त २०० रुपये भरा अन् दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळवा! जाणून घ्या 'या' सरकारी स्कीमचे जबरदस्त फायदे

NPS Scheme: दररोज फक्त २०० रुपये भरा अन् दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळवा! जाणून घ्या 'या' सरकारी स्कीमचे जबरदस्त फायदे

नोकरदार वर्ग आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध स्कीममध्ये गुंतवणूक करतो. सर्वांनाच आपल्या उतारवयात इतर कुणावर अवलंबून राहू नये असं वाटत असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:23 PM2022-12-16T17:23:28+5:302022-12-16T17:24:32+5:30

नोकरदार वर्ग आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध स्कीममध्ये गुंतवणूक करतो. सर्वांनाच आपल्या उतारवयात इतर कुणावर अवलंबून राहू नये असं वाटत असतं.

national pension scheme save 200 rupees per days and get 50 thousand pension | NPS Scheme: दररोज फक्त २०० रुपये भरा अन् दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळवा! जाणून घ्या 'या' सरकारी स्कीमचे जबरदस्त फायदे

NPS Scheme: दररोज फक्त २०० रुपये भरा अन् दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळवा! जाणून घ्या 'या' सरकारी स्कीमचे जबरदस्त फायदे

नवी दिल्ली-

नोकरदार वर्ग आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध स्कीममध्ये गुंतवणूक करतो. सर्वांनाच आपल्या उतारवयात इतर कुणावर अवलंबून राहू नये असं वाटत असतं. त्यात काही गैरही नाही. यामुळेच नोकरीच्या काळात आपल्या पगारातील काही रक्कम एखाद्या योजनेत गुंतवण्याचा उत्तम पर्याय ठरतो. सरकारकडूनही अशा काही योजना चालवल्या जातात त्या नक्कीच सुरक्षित तर आहेतच पण भविष्याच्या दृष्टानं फायदेशीर ठरतात. सरकारच्या अशाच एका योजनेची माहिती आपण जाणून घेणार आहोत. रिटायरमेंट फंडसाठी ही योजना सर्वाधिक पसंतीची मानली जाते. 

एनपीएसची स्कीम थेट सरकारशी जोडली गेलेली आहे आणि यात तुम्ही दरमहा ६ हजार रुपये गुंतवून वयाच्या साठीनंतर दरमहा ५० हजार रुपये पेन्शन स्वरुपात प्राप्त करू शकता. म्हणजेच तुम्हाला दरदिवशी २०० रुपयांची रक्कम या योजनेत गुंतवावी लागेल. तसंच या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकरात देखील सूट मिळते. एनपीएसमध्ये गुंतवणुकदारांना 80C अंतर्गत सूट तर मिळतेच पण त्यासोबत 80 CCD अंतर्गत अतिरिक्त ५० हजार रुपयांपर्यंतची आयकर सूट मिळते. 

एनपीएसला दीर्घकालीन गुतंवणूक मानलं जातं. या योजनेअंतर्गत नोकरीकाळात पैसा जमा करायचा असतो जो निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शनच्या स्वरुपात दरमहा मिळू लागतो. एनपीएसमध्ये जमा केलेली रक्कम दोन प्रकारे मिळवता येऊ शकते. पहिला पर्याय म्हणजे जमा केली गेलेली राशीपैकी एक निधारित हिस्सा तुम्ही एकदाच काढू शकता. तर दुसरा पर्याय म्हणजे पेन्शन स्वरुपात दरमहा पैसे मिळवू शकता. 

दोन पद्धतीचे अकाऊंट
एनपीएसमध्ये दोन पद्धतीचे अकाऊंट सुरू केले जातात. एनपीएस टिअर-१ आणि एनपीएस टिअर-२ असे दोन अकाऊंट उघडले जातात. मुख्यत्वे टिअर-१ अकाऊंट अशा लोकांसाठी आहे ज्यांचा पीएफ जमा होत नाही आणि त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची गरज असते. यात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये जमा करुन अकाऊंट सुरू करू शकता. निवृत्तीनंतर एकावेळी ६० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता आणि उर्वरित ४० टक्के रकमेतून अॅन्यूटी खरेदी केली जाते. 

५० हजार रुपये पेन्शन कशी मिळवावी?
आता दरमहा ५० हजार रुपये पेन्शन हवी असेल तर किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल याची माहिती जाणून घेऊयात. NPS कॅलल्युलेटनुसार जर एखादा व्यक्ती वयाच्या २४ व्या वर्षापासून एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असेल तर दरमहा ६ हजार रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच दरदिवशी २०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर त्याला वयाच्या ६० वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. म्हणजेच त्याला एकूण ३६ वर्ष गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. 

वयाच्या ६० वर्षापर्यंत त्याचे एकूण २५,९२,००० रुपये जमा होतात. आता जर १० टक्के रिटर्न्स पकडले तर एकूण कॉर्प्स व्हॅल्यू २,५४,५०,९०६ रुपये इतकी होते. मग NPS मॅच्युरिटी इन्कममधून ४० टक्के इतकी अॅन्युटी खरेदी केली तर रक्कम १,०१,८०,३६२ रुपये इतकी होते. गुंतवणुकीवर १० टक्के रिटर्न्स पकडले तर १,५२,७०,५४४ इतकी मिळकत होते. यापद्धतीनं वयाच्या ६० व्या वर्षानंतर दरमहा त्या व्यक्तीला ५०,९०२ रुपये पेन्शन स्वरुपात मिळू शकतात. 

Web Title: national pension scheme save 200 rupees per days and get 50 thousand pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.