NPS CALCULATOR : सध्या बाजारात अनेक प्रकारचे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही आत्तापासूनच निवृत्तीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे गरजेचं आहे. कारण, तुमचै पैसे महागाईच्या कसोटीवर फक्त टिकलेच नाही तर वाढलेही पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या NPS योजनेची माहिती देणार आहोत. या योजनेत तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर आरामात १ लाख रुपये पेन्शन मिळेल. चला याचं आर्थिक गणित समजून घेऊ.
NPS अर्थात नॅशनल पेन्शन योजना ही सरकारी सेवानिवृत्ती आणि बचत योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. तुम्हाला निवृत्तीनंतर महिन्याला १ लाख रुपये पेन्शन हवी असेल तर कोणत्या वयापासून आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी? हे माहिती असणे आवश्यक आहे.
एनपीएसमध्ये कधी गुंतवणूक सुरू करावी?
समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करत आहात आणि तुम्ही ६० वर्षे गुंतवणूक करणार आहात. या गुंतवणुकीवर तुम्हाला सरासरी १२ टक्के वार्षिक व्याज मिळेल असं गृहीत धरलं तर किती गुंतवणूक करायची ते पाहू.
गुंतवणूक योजना
निवृत्तीनंतर तुम्हाला १ लाख रुपये मासिक पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला त्यानुसार गुंतवणूक करावी लागेल. वयाची २५ वर्षे ते ६० वर्षे म्हणजे एकूण ३५ वर्ष तुम्हाला ही गुंतवणूक करायची आहे. वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा गृहीत धरला तर तुम्हाला दरमहा अंदाजे ७,७५० रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही ३५ वर्षे सतत दरमहा सुमारे ७,७५० रुपये गुंतवता तेव्हा तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ५ कोटी रुपये होईल. यानंतर, अंदाजे ४० टक्के गुंतवणूक वार्षिकी योजनेत अंदाजे ६ टक्के व्याजाने गुंतवावी लागेल. या गुंतवणुकीद्वारे, तुम्हाला दरमहा १ लाख रुपये पेन्शन आरामात मिळेल.
एनपीएस योजनात जोखीम किती?
एनपीएस योजनेत गुंतवलेले पैसे शेअर बाजारात गुंतवले जातात. त्यामुळे ही योजना बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. मात्र, योजनेचा दीर्घ कालावधी यातील जोखीम करण्यास मदत करते. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर शेअर बाजारातील दीर्घकालीन योजनेत जोखमी नसल्याच्या बरोबर आहे.