Lokmat Money >गुंतवणूक > Nestaway sold: 1800 कोटींच्या कंपनीची 90 कोटींमध्ये विक्री, रतन टाटांनी केली होती गुंतवणूक...

Nestaway sold: 1800 कोटींच्या कंपनीची 90 कोटींमध्ये विक्री, रतन टाटांनी केली होती गुंतवणूक...

Nestaway sold at 95% Discount: कोरोना काळात मोठा फटका, तीन वर्षात होत्याचं नव्हतं झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 03:59 PM2023-06-04T15:59:05+5:302023-06-04T15:59:18+5:30

Nestaway sold at 95% Discount: कोरोना काळात मोठा फटका, तीन वर्षात होत्याचं नव्हतं झालं.

Nestaway sold: 1800 crores company sold for 90 crores, Ratan Tata invested | Nestaway sold: 1800 कोटींच्या कंपनीची 90 कोटींमध्ये विक्री, रतन टाटांनी केली होती गुंतवणूक...

Nestaway sold: 1800 कोटींच्या कंपनीची 90 कोटींमध्ये विक्री, रतन टाटांनी केली होती गुंतवणूक...

Nestaway sold: रेंटवर फ्लॅट्स किंवा घर मिळवून देणाऱ्या नेस्टअवे (Nestaway) स्टार्टअपची ऑरम प्रॉपटेक (Aurum Proptech) ने त्याच्या मूल्यांकनापेक्षा 95 टक्के कमी दराने खरेदी केली आहे. 2019 मध्ये कंपनीची व्हॅल्यू 1800 कोटी रुपये होती, पण याची विक्री फक्त 90 कोटींमध्ये झाली आहे. अवघ्या 3 वर्षातच अंदर कंपनीचा ग्राफ वेगाने खाली आला. यामागे कोव्हिड 19 एक मोठे कारण आहे. कोरोनात लोक आपापल्या घरात परतले आणि नेस्टअवेला मोठा फटका बसला.

नेस्टअवे खरेदी करणाऱ्या ऑरमने गेल्यावर्षी हेलो वर्ल्ड नावाच्या एका स्टार्टअपचेही अधिग्रहण केले होते. या कंपनीला आधी नेस्टअवेने खरेदी केले, नंतर ऑरमने विकत घेतले. आता ऑरमने नेस्टअवेलाही खरेदी केले आहे. हेलो वर्ल्डचे संस्थापक जितेंद्र जगदेव आणि इस्माइल खान आता अधिग्रहित नेस्टअवेचे प्रमुख असतील. ऑरम आता नेस्टअवेणध्ये सूमारे 30 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ऑरमने एका निवेदनातून याची माहिती दिली आहे. 

कंपनींची माहिती
नेस्टअवेची सुरुवात अमरेंद्र साहू, दीपक धार, स्मृती परिदाने 2015 मध्ये केली होती. या कंपनीने अखेरची फंडिंग 2019 मध्ये मिळवली. तेव्हा कंपनीची व्हॅल्यूएशन 22.5 कोटी डॉलर होती, जी भारतीय रुपयांमध्ये सूमारे 1854 कोटी रुपये होते. पण, कोविड-19 महामारीदरम्यान अनेकदण आपापल्या घरी परतले आणि कंपनीला मोठा फटका बसला. कोरोनापूर्वी यांच्या वेबसाइटवर 50,000 प्रॉपर्टीतून कंपनी दरवर्षी 100 कोटी रेव्हेन्यू जेनरेट करायची. कोरोना काळात प्रॉपर्टीज 18,000 हजारांवर आल्या आणि रेव्हेन्यू 30 कोटींवर आला.

रतन टाटा, कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीची गुंतवणूक
नेस्टअवेला अनेक मोठ्या संस्थेकडून फंडिंग मिळाली होती. यात सर्वाधिक चर्चेत नावांमध्ये यूसी-आरएनटी आणि टायगर ग्लोबल होती. यूसी-आरएनटी, रतन टाटांच्या आएरनटी असोसिएट आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे जॉइंट व्हेंचर आहे. तसेच, टायगर ग्लोबल एक अमेरिकन इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, ज्याचे फंडिंग क्षेत्रात मोठे नाव आहे.
 

Web Title: Nestaway sold: 1800 crores company sold for 90 crores, Ratan Tata invested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.