कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) सदस्यांच्या खात्यांमधील नाव, आधारसह ११ प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी नवीन प्रक्रिया जारी केली आहे. संस्थेनं जारी केलेल्या नवीन परिपत्रकात नाव, लिंग, जन्मतारीख, वडिलांचे नाव, नातेसंबंध, वैवाहिक स्थिती, सामील होण्याची तारीख, सोडण्याचे कारण, सोडण्याची तारीख, राष्ट्रीयत्व आणि आधार क्रमांक अपडेट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नवीन प्रक्रियेमुळे ईपीएफ सदस्यांना त्यांचे प्रोफाइल डिटेल्स अपडेट करणं सोपं होईल आणि क्लेम प्रोसेसिंगमध्ये या कारणांमुळे होणारं रिजेक्शन सारखी स्थिती टाळता येईल. यासोबतच डेटा न जुळल्याने होणारी फसवणूकही टळणार आहे.
'प्रकियांमध्ये अनियमित आणि नॉन स्टँडर्डायझेशनच्या कारणामुळे काही प्रकरणांत सदस्याच्या ओळखीशी छेडछाड केल्याचं करण्यात आली, त्यामुळे फसवणूक झाल्याचं दिसून आलंय. ११ पैकी ५ बदल सामान्य असल्याचे गृहित धरण्यात आलेत. यापेक्षा अधिक बदलांवर सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. लहान मोठे छोटे अपडेशन रिक्वेस्ट म्हणजे प्रोफाईल अपडेशन T+7 दिवसांत होईल आणि मोठे बदल T+15 दिवसांत होईल,' असं काही दिवसांपूर्वी आलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटलंय.
जोडावे लागतील डॉक्युमेंट्स
प्रत्येक बदलासाठी कागदोपत्री पुरावा आवश्यक असेल. मग ते अपडेट लहान असो वा मोठे अपडेट. किरकोळ बदलांसाठी, दिलेल्या यादीतील किमान दोन कागदपत्रं सादर करावी लागतील. मोठे बदल झाल्यास, तीन कागदपत्रांची आवश्यकता असेल.
असा करा बदल
- आपल्या Universal Account Number (UAN) आणि पासवर्डनं पोर्टलवर लॉग इन करा.
- त्यानंतर Joint Declaration (JD) टॅबवर क्लिक करा.
- आधारशी निगडीत नंबरवर एक OTP येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर Joint Declaration तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल.
- आता आवश्यक बदल करण्यासाठी मागण्यात आलेली डॉक्युमेंट्स अटॅच करा.