Join us  

न्यू ईयरच्या पूर्वसंध्येला ५ बँकांकडून खातेदारांना गिफ्ट; ग्राहकांना मिळेल 'हा' लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 5:04 PM

देशातील ६ महत्त्वाच्या बँकांनी त्यांच्याकडी मुदत ठेव रकमेच्या (फिक्स डिपॉझिट) व्याजावर चांगलीच वाढ केली आहे. 

नवी दिल्ली - उद्यापासून नवं कॅलेंडर, नव वर्ष आणि नवे संकल्प घेऊन प्रत्येकजण नव्याने कामाला लागणार. सरत्या वर्षाला आज अखेरचा निरोप देऊन उद्यापासून २०२४ चे जल्लोषात स्वागत होत आहे. नवीन वर्षांच्या स्वागतपर बाजारात खरेदीसाठी ग्राहकांना मोठ्या ऑफर्स आहेत. विशेष म्हणजे बँकांनीही ग्राहकांना नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच गिफ्ट दिलंय. देशातील ६ महत्त्वाच्या बँकांनी त्यांच्याकडी मुदत ठेव रकमेच्या (फिक्स डिपॉझिट) व्याजावर चांगलीच वाढ केली आहे. 

बँक ऑफ बडोदाचं नाव या बँकांच्या यादीत अग्रस्थानी असून स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा यांचाही समावेश आहे. बँक ऑफ बडोदाने त्यांच्याकडील मुदत ठेव रकमेत १० बेसिस पाईंटपासून ते १२५ बेसिस पॉईंट किंवा ०.१० टक्के ते १.२५ टक्के पर्यंत वाढ केली आहे. २ कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर ही वाढ करण्यात आली आहे. तर, २९ डिसेंबर २०२३ पासून हा लाभ घेता येणार आहे. 

ग्राहकांना मुदत ठेव रकमेच्या व्याजदरात वाढ देणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, डीसीबी बँक, फेडरल बँक यांचा समावेश आहे. 

टॅग्स :बँकएसबीआयबँकिंग क्षेत्रपैसा