Join us  

NFO: ₹१०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; दीर्घकाळात बनू शकेल मोठा फंड; २४ जुलैपर्यंत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:59 PM

Mutual Fund NFO: या एनएफओमध्ये तुम्ही २४ जुलै २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता. इक्विटी कॅटेगरीत, ही बीएसई पीएसयू इंडेक्स ट्रॅक करणारी ही ओपन-एंडेड स्कीम आहे.

Mutual Fund NFO: असेट मॅनेजमेंट कंपनी कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाची (Kotak Mahindra Mutual Fund) नवी स्कीम कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स फंडात (Kotak BSE PSU Index Fund) गुंतवणूक करण्याची संधी आहे. या एनएफओमध्ये तुम्ही २४ जुलै २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता. इक्विटी कॅटेगरीत, ही बीएसई पीएसयू इंडेक्स ट्रॅक करणारी ही ओपन-एंडेड स्कीम आहे.

₹१०० पासून करू शकता गुंतवणूक

असेट मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स फंडात किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. या फंडात बीएसई ५०० निर्देशांकातून निवडलेल्या ५६ पीएसयू स्टॉक्सचा समावेश आहे. या निर्देशांकात विविध क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रमांचा समावेश आहे.

कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी कोटक बीएसई पीएसयू इंडेक्स फंड हे गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता आणि त्यांना किती काळ गुंतवणूक करायची आहे यावर आधारित तयार करण्यात आलेला प्रोडक्ट असल्याची प्रतिक्रिया दिली. हा फंड पीएसयू कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी एक सुव्यवस्थित दृष्टीकोन प्रदान करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

असेट मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या गुंतवणूकदारांना लाँग टर्म कॅपिटल ग्रोथ हवी आहे, त्यांच्यासाठी हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो. मात्र, या योजनेतील गुंतवणुकीचं उद्दिष्ट साध्य होईलच याची शाश्वती नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(टीप - यामध्ये एनएफओची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा