Nifty ETF Funds: पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. यासाठी अनेकजण मुलांच्या जन्मापूर्वीच विविध योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात. तुम्हाला तुमच्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी करोडपती बनवायचे असेल, तर आता ते सहज शक्य आहे. यासाठी तुम्हाला योग्य नियोजनाची गरज आहे. तुम्ही दरमहा योग्य गुंतवणूक केली, तर तुमच्याकडे 18व्या वर्षी 1 कोटी रुपयांचा निधी असेल.
सध्या भारतात शिक्षण क्षेत्रातील महागाई दर 12 टक्क्यांच्या आसपास आहे. या महागाईमुळे शाळा-कॉलेजचे शुल्क दर 6 महिने किंवा एका वर्षात दुप्पट होत आहे. अशा परिस्थितीत, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.
1 कोटींचा निधी कसा तयार करायचा? उदाहरणासह समजून घ्या...
समजा तुम्ही तुमच्या मुलगा किंवा मुलीच्या नावे 3 इन 1 चाइल्ड अकाउंट उघडले, ज्यामध्ये एक बँक अकाउंट, एक अकाउंट आणि एक ट्रेडिंग अकाउंट आहे. यानंतर नवरा-बायको, दोघांनी मुलीसाठी दरमहा 6500-6500 रुपये बचत करण्याचे ठरवले. म्हणजेच दरमहा एकूण 13000 रुपयांची बचत होईल. यानंतर ही रक्कम निफ्टी ETF द्वारे इंडेक्स निफ्टी-50 मध्ये गुंतवा.
निफ्टी-50 चे काही प्रसिद्ध ईटीएफ
1. NIFTY BeES
2. Nifty 50 ETF
3. NIFTY ETF
दरवर्षी 1.56 लाख रुपये गुंतवावे लागतील
तुम्हाला दरवर्षी सुमारे 1.56 लाख रुपये गुंतवावे लागतील. 18 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 28 लाख रुपये होईल. जर आपण NIFTY0-50 ETF च्या पॅटर्नकडे पाहिले, तर ते दरवर्षी सुमारे 12 टक्के परतावा देत आहेत. तुम्हाला दरवर्षी सरासरी 12% परतावा मिळाल्यास, तुमच्या 18 व्या वर्षी 1 कोटी रुपये सहज मिळतील. विशेष म्हणजे, गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढत राहिल्यास मुलीला वयाच्या 18 व्या वर्षी 1 कोटींहून अधिक रक्कम मिळू शकेल. यातून मुलगा-मुलीचे उच्च शिक्षण, प्रवास आणि लग्न यांसारख्या खर्चात खूप मदत होईल.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)